Thursday, June 26, 2025
Home बॉलीवूड पत्नींसोबत ‘या’ सेलिब्रिटी पतींनीदेखील ठेवले आपल्या पत्नींसाठी करवाचौथचे व्रत

पत्नींसोबत ‘या’ सेलिब्रिटी पतींनीदेखील ठेवले आपल्या पत्नींसाठी करवाचौथचे व्रत

भारतात अनेक सणउत्सव मोठ्या उत्साहाने साजरे होत असतात. अशातच रविवारी (२४ ऑक्टोबर) सर्वत्र करवाचौथ हा सण साजरा होत आहे. या दिवशी महिला त्यांच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी निर्जळी उपवास करत असतात. असे मानले जाते की, हे व्रत केल्याने पतीला आयुष्यात जास्त कष्ट करावे लागत नाही. मनोरंजन क्षेत्रात देखील करवाचौथ मोठ्या उत्साहाने साजरी होत आहे.

अशातच बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री त्यांच्या पतीसाठी करवा चौथचे व्रत करतात. हे व्रत केवळ काही अभिनेत्री नाही तर बॉलिवूडमधील अनेक अभिनेते देखील असे आहेत की, जे त्यांच्या पत्नीसाठी हे व्रत करतात. चला तर जाणून घेऊया त्या कलाकारांबाबत जे त्यांच्या पत्नीसाठी करवाचौथचे व्रत करतात. (Karwa chauth 2021 Ranveer Singh to virat kohli these celebs keep fast for thier wife’s)

रणवीर सिंग
दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांचे प्रेम जग जाहीर आहे. रणवीर त्याच्या पत्नीवर किती प्रेम करतो, ही गोष्ट सगळ्यांच माहित आहे. अशातच रणवीरने त्याचा शो ‘द पिक्चर’मध्ये सांगितले की, या वर्षी तो त्याच्या पत्नीसाठी व्रत करणार आहे. एवढेच नाही तर त्याने दीपिकाच्या नावाची हातावर मेहेंदी देखील काढली आहे.

आयुष्मान खुराना
अभिनेता आयुष्मान खुराना याच्यावर आज लाखो मुली फिदा आहेत परंतु त्याचे त्याच्या पत्नीवर खूप प्रेम आहे. तो दरवर्षी त्याच्या पत्नीसाठी करवाचौथचे व्रत करतो. २००८ मध्ये त्याने एक पोस्ट करून सांगितले होते की, त्याची पत्नी हे व्रत करू शकत नाही. त्यामुळे हे व्रत आता तो करणार आहे. त्याची ताहिरा हिच्यावर सध्या कॅन्सरचे उपचार चालू आहे. त्यामुळे आयुष्मानने केवळ तिच्यासाठी व्रत केले नाही तर तिच्यासाठी हातावर मेहेंदी देखील काढली आहे.

विराट कोहली
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हिचा पती विराट कोहली हा त्याच्या पत्नीवर खूप प्रेम करतो. तो देखील अनुष्कासाठी दरवर्षी व्रत करतो. सोशल मीडियावर त्या दोघांचे सुंदर फोटो देखील व्हायरल होत असतात.

अभिषेक बच्चन
बॉलिवूडधील लोकप्रिय जोडपे ऐश्वर्या रॉय आणि अभिषेक बच्चन यांच्यामध्ये खूप प्रेम आहे. जेवढा सन्मान ऐश्वर्या अभिषेकला देते तेवढाच सन्मान अभिषेक देखील ऐश्वर्याला देतो. दरवर्षी अभिषेक देखील त्याच्या पत्नीसाठी व्रत करत असतो. त्याचे अनेक फोटो देखील व्हायरल होत असतात.

प्रिन्स नरूला
बिग बॉस फेम आणि टेलिव्हिजन स्टार प्रिन्स नरूला हा त्याची पत्नी युविका चौधरीसाठी दरवर्षी करवाचौथचे व्रत करतो. तो त्याच्या पत्नीवर प्रेम दाखवण्याची एकही संधी सोडत नाही. युविका देखील प्रिन्सवर खूप प्रेम करतो. तिने एका मुलाखतीत या गोष्टीचा खुलासा केला होता की, प्रिन्स तिच्यासाठी दरवर्षी व्रत करतो.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

राज कुंद्रा अन् शिल्पा शेट्टीचा सुरूये वाद? पतीशिवाय अभिनेत्री गेली कौटुंबिक ट्रिपला

गुलाबी साडीत कमाल दिसतेय रिंकू, अभिनेत्रीच्या पारंपारिक लूकने वाढवले चाहत्यांच्या हृदयाचे ठोके

सेटवरील गोळीबारात झालेल्या मृत्यूमुळे प्रियांका झालीय दुःखी, आपल्या भावना शेअर करत म्हणाली…

हे देखील वाचा