Thursday, April 17, 2025
Home मराठी यालाच म्हणतात खरे प्रेम! शून्य डिग्री तापमानात उमेश कामतने प्रियासाठी दिली प्रेमाची परीक्षा

यालाच म्हणतात खरे प्रेम! शून्य डिग्री तापमानात उमेश कामतने प्रियासाठी दिली प्रेमाची परीक्षा

नेहमीच नवरा आणि बायको यांच्या नात्यावर माध्यमांमध्ये, सोशल मीडियावर विविध पोस्ट येत असतात. यातल्या बहुतेक पोस्ट या मजेशीर असतात. कलाकार देखील त्यांच्या सोशल मीडियावर याच विषयाशी संबंधित अनेक मजेशीर रील शेअर करत असतात. असेच मराठी इंडस्ट्रीमधील सर्वात लोकप्रिय, क्युट आणि प्रसिद्ध कपल म्हणजे प्रिया बापट आणि उमेश कामत. नेहमीच हे दोघं त्यांच्या कामामुळे आणि सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असतात. मराठी इंडस्ट्रीमधील मोस्ट फेव्हरेट कपल म्हणून हे ओळखले जातात. सध्या उमेश आणि प्रिया दोघेही काश्मीरमध्ये त्यांच्या सुट्ट्या एन्जॉय करत आहे. त्यांनी त्यांच्या या ट्रिपचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

अनेकदा पती पत्नीच्या नात्यामध्ये असे काही क्षण येतात. जेव्हा पती किंवा पत्नीला त्यांच्या नात्यासाठी किंवा त्यांचे प्रेम सिद्ध करण्यासाठी परीक्षा द्यावी लागते. अशीच काहीशी परीक्षा दिली आहे उमेश कामतने त्याच्या पत्नीसाठी अर्थात प्रियासाठी. आता ती परीक्षा कोणती? कशी? का? कुठे या सर्वांची उत्तरं त्याने त्याच्या व्हिडिओमधून दिली आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Umesh Kamat (@umesh.kamat)

उमेशने त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला असून या व्हिडिओमध्ये त्याने सांगितले, “प्रेमाची परीक्षा काय असते ही बघा. आता सकाळचे सात वाजले आहेत. सहापासून आम्ही उठलो. इथे शून्य डिग्री तापमान आहे. मी आत्ता माझ्या बायकोसाठी कुठे चाललोय तर भाजी मार्केट बघायला. आम्हाला भाजी घ्यायची नाहीये फक्त भाजी मार्केट बघायचे. यापेक्षा प्रेमाची परीक्षा दुसरी कुठलीही असू शकत नाही. दादर मार्केटमध्ये उठून जातो सकाळी मात्र आम्ही काश्मीरमध्ये फिरायला आलोय पण सकाळी फक्त ब्रश करून भाजी मार्केट बघायला चाललो आहोत.” उमेश हे बोलत असतो तेव्हा प्रियाला त्याच्या बोलण्यामुळे येणारे हसू आवरता देखील येत नव्हते. या व्हिडिओच्या शेवटी उमेशने चाहत्यांना काश्मीरमधील फ्लोटिंग भाजी मार्केटचीही झलक दाखवली. त्याच्या या पोस्टवर मराठी इंडस्ट्रीमधील अनेक कलाकारांनी फनी कमेंट्स केल्या आहेत.

तत्पूर्वी प्रिया आणि उमेश हे मराठी इंडस्ट्रीमधील लोकप्रिय कपल असून, ते मनोरंजनाच्या सर्वच माध्यमांमध्ये काम करताना दिसतात. सध्या प्रियाची निर्मिती असलेले आणि उमेशचा अभिनय असलेले ‘दादा एक गुड न्यूज आहे’ हे नाटक तुफान गाजत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
काली काली जुल्फों के …! रिधीमा पंडीतची घायाळ करणारी अदा, पाहाच फोटो गॅलरी
अनुपम खेर यांनी ट्विट करत ‘या’ सुपरहिट सिनेमाच्या सिक्वलची केली मागणी, अक्षय कुमारने देखील दिला दुजोरा

हे देखील वाचा