गेल्या अनेक दिवसांपासून विकी कौशल आणि कॅटरिना कैफ या दोघांच्या लग्नाची चर्चा सुरू आहे. अशात आता त्यांच्या लग्नाच्या तारखेपासून ते जेवणात असणाऱ्या पदार्थांपर्यंत सर्व काही ठरवले आहे. दोघांचे लग्न हे याच वर्षी होणार असल्याचे म्हटले जात आहे. कालपर्यंत दोघांच्या कपड्यांवर चर्चा सुरू होती, तर आज या दोघांच्या लग्नाचे ठिकाण आणि जेवण या विषयी चर्चा रंगली आहे.
कॅटरिना आणि विकीचे लग्न शाही पद्धतीचे असणार, असा अंदाज वर्तवला जात आहे. दोघेही डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यात लग्नबंधनात अडकतील. तसेच हे लग्न अवघ्या १०० ते २०० माणसांमध्ये होणार असून कुटुंबीयांसह बॉलिवूडची मोठ- मोठी मंडळीही लग्नाला हजर होणार आहेत.
शाही लग्नाचा घातला आहे थाट
माध्यमांतील वृत्तांनुसार, बॉलिवूडच्या या जोडप्याचे लग्न हे राजस्थानमधील सिक्स सेन्सेस किल्ला बारवरा रिसॉर्टमध्ये होणार आहे. हा किल्ला १४व्या दशकातील म्हणजे तब्बल ७०० वर्षे जुना आहे. तसेच रणथंबौर नॅशनल पार्क या किल्ल्यापासून फक्त ३० मिनिटांच्या अंतरावर आहे. शाही पद्धतीने होणाऱ्या या लग्नामध्ये जेवण देखील राजा महाराजांप्रमाणे शाहीच असणार आहे.
शाही लग्नासाठी शाही पोशाख देखील झालाय तयार
या दोघांच्या लग्नाचे कपडे प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यासाची तयार करत आहेत. अशात कॅटरिनाने यासाठी एका सिल्क कापडाची निवड केली आहे. याचा ती घागरा शिवून घेणार आहे. तसेच विकी देखील अनोख्या अंदाजात पाहायला मिळेल. बुधवारी (२७ ऑक्टोबर) कॅटरिना कैफची आई आणि बहीण दोघी ट्रॅडिशनल शॉपिंग करताना दिसल्या होत्या. पत्रकारांनी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देणे टाळले. तसेच विकी आणि कॅटरिनाने देखील यावर स्वतः ची प्रतिक्रिया दिलेली नाही. काही दिवसांपूर्वी देघे एकत्र एका ठिकाणी स्पॉट झाले होते. त्यावेळी विकीच्या रेंज रोव्हरचा नंबर ७७२२ होता आणि कॅटरिनाच्या रेंज रोव्हर गाडीचा नंबर ८८२२ होता. यावरुन देखील दोघांच्या प्रेम कहानीला चांगलेच उधाण आले होते.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-बाबो, हिने तर समुद्रातच आग लावली की! दिशा पटानीचे पांढऱ्या रंगाच्या बिकिनीमधील सिझलिंग फोटो
-‘आमच्या नात्यात संवाद असता तर…’ करणने शमितासोबत शेअर केले ब्रेकअपचे कारण
-शाहिद कपूर आणि अमृता रावच्या सुपरहिट ‘इश्क विश्क’ चित्रपटाचा येणार सिक्वल