बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांच्या प्रेमप्रकरणाची जोरदार चर्चा सध्या माध्यमांमध्ये सुरू आहे. या दोघांनी या बातमीला अधिकृत दुजोरा दिला नसला, तरी दोघेही एकमेकांसोबत फिरताना अनेकदा दिसून येत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, कॅटरिना आणि विकी आपल्या चाहत्यांना सुखद धक्का देण्याच्या तयारीत आहेत. दोघेही लवकरच विवाहबंधनात अडकणार असून दोघांच्या घरी लग्नाची तयारी सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे. आता या शाही विवाहसोहळ्याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.
या प्रसिद्ध डिझायनरने डिझाईन केलेत दोघांचे पोषाख
एका प्रसिद्ध वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, बॉलिवूडची प्रसिद्ध जोडी कॅटरिना आणि विकी लवकरच विवाह बंधनात अडकणार असून दोघांच्या घरी लवकरच सनई चौघडे वाजणार आहेत. इतकेच नव्हे, तर कॅटरिना आणि विकी कौशलने लग्नाच्या तयारीला सुरुवात केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, दोघांचेही लग्नाचे कपडे प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यासाची यांनी डिझाईन केले आहेत. सध्या ते कपड्यांसाठी फॅब्रिक निवडत आहेत.
याबद्दल मिळालेल्या माहितीनुसार, कॅटरिना रॉ सिल्क फॅब्रिक वापरणार आहे. कॅटरिना आणि विकीचे लग्न नोव्हेंबर, डिसेंबर दरम्यान होईल, ज्यामध्ये कॅटरिना सुंदर लेहंगा घालणार आहे.
तत्पूर्वी कॅटरिना आणि विकीच्या रोका कार्यक्रमाचीही जोरदार चर्चा माध्यमांत रंगली होती. दोघांनी गुपचूप साखरपुडा उरकल्याचीही बातमी समोर आली होती. कॅटरिना आणि विकी अनेकदा सोबत फिरतानाचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळाले होते. नुकतेच दोघे विकी कौशलच्या ‘सरदार उधम’ चित्रपटाच्या स्क्रीनिंगवेळी सोबत दिसून आले होते.
चाहत्यांना लागली उत्सुकता
कॅटरिना आणि विकीच्या लग्नाच्या बातमीने त्यांचे चाहते आनंदी झाले असून सगळ्यांना या शाही विवाहसोहळ्याची उत्सुकता लागली आहे.
अभिनेत्री कॅटरिना कैफ हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध आहे. आपल्या सौंदर्याने आणि दमदार अभिनयाने तिने चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. अलीकडेच ती आगामी चित्रपट ‘सूर्यवंशी’च्या प्रमोशनसाठी रणवीर सिंगच्या ‘द बिग पिक्चर’ कार्यक्रमात पोहोचली होती. यावेळी कॅटरिना रणवीर सिंगसोबत धमाल करताना दिसून आली होती. चित्रपटात कॅटरिना कैफसोबत अक्षय कुमारसुद्धा प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-यंदा कर्तव्य आहे! रणबीर आणि आलिया अडकणार लग्नबंधनात; इटलीत घेणार सात फेरे?
-अभिनेत्री नेहा शर्माच्या फोटोसोबत करण्यात आली होती अश्लील छेडछाड, तिनेही फोटो शेअर करत घेतला समाचार
-अंदमानातील सेल्युलर जेलला भेट देताना स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल गौरवोद्गार काढत कंगना म्हणाली…










