Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

हॉट कपल असणाऱ्या कॅटरिना आणि विक्की यांच्यामध्ये ‘बार्बी डॉल’ आहे कमाईच्याबाबतीत सर्वात पुढे

कॅटरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नाच्या बातम्यांनी खूपच जोर पकडला आहे. याच डिसेंबर महिन्यांत ९ तारखेला कॅटरिना आणि विक्की लग्न करणार असल्याच्या बातम्या सतत ऐकायला, पाहायला मिळत आहे. याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा कॅटरिना किंवा विक्कीकडून करण्यात आली नसली तरी ते लग्न करणार असल्याचे आता पक्के झाले आहे असेच मीडियामधील बातम्यांवरून दिसत आहे. त्यांच्या लग्नाची जोरदार तयारी चालू असून याच अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना देखील दिसत आहे. वैयक्तिक आयुष्यात कॅटरिना आणि विक्की यांचे खूप पक्के बॉंडिंग असल्याचे समजते. वैयक्तिक आयुष्यात जरी कॅटरिना आणि विकी सामान पातळीवर असले तरी त्यांच्या व्यावसायिक आयुष्यात पाहिले तर कॅटरिना विक्कीच्या खूप पुढे आहे. प्रत्येक बाबतीत कमाई, लोकप्रियता, प्रसिद्धी, फॅन्स आदी अनेक बाबतीत ती पुढे आहे. आज या लेखातून जाणून घेऊया विक्की आणि कॅटरिनाच्या कमाईमधील तफावतीबद्दल.

Photo Courtesy: Instagram/vickykaushal09 & katrinakaif

कॅटरिना कैफ बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी आणि अमाप लोकप्रियता असणारी अभिनेत्री आहे. जी एका चित्रपटासाठी तब्बल ११ कोटी रुपये मानधन घेते. बॉलिवूडच्या सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत कॅटरिना टॉपवर आहे. याशिवाय तिला पाच वेळा जगातील सर्वात मादक स्त्री म्हणून गौरवण्यात आले आहे. फोर्ब्स मासिकानुसार २०१७ सालानंतर तीन वर्ष कॅटरिना जगातील सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या १०० कलाकारांच्या यादीत सामील होती. २०१९ साली ती २३ व्या क्रमांकावर होती. एका रिपोर्टनुसार कॅटरिना प्रत्येकवर्षी तब्बल २३.६४ कोटी रुपयांची कमाई करते. कोणत्याही ब्रँड एंडोर्समेंटसाठी ती ६/८ कोटी रुपये चार्ज करते. एकूण पाहिले तर कॅटरिना २२० कोटी रुपयांच्या संप्पतीची मालकीण आहे.

तर दुसरीकडे विकी कौशलबद्दल बोलायचे झाल्यास तो कमाईच्या बाबतीत कॅटरिनापेक्षा खूप मागे आहे. मात्र त्याने त्याच्या मेहनतीने, संघर्षाने आणि प्रतिभेने या क्षेत्रात स्वतःचे नाव कमावत यशस्वी अभिनेत्यांच्या यादीत स्थान पटकावले आहे. विकीला राष्ट्रीय पुरस्काराने देखील गौरवण्यात आले असून, तो एका सिनेमासाठी ३/४ कोटी रुपये घेतो. विक्की कौशल २०१९ साली फोर्ब्स इंडियाच्या टॉप १०० कलाकारांमध्ये सामील होता. त्याची एकूण संपत्ती ३ मिलियन डॉलर अर्थात २२ कोटी रुपयांच्या आसपास आहे.

सध्याच्या घडीला कॅटरिना कैफ आणि विक्की कौशल हे इंडस्ट्रीमधील हॉट कपल असून, ते एकमेकांसोबत मेड फॉर इच अदर वाटतात. यादोघांना सोबत बघण्यस्तही त्यांचे फॅन्स खूपच आतुर झाले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

टेलिव्हिजन विश्वातील ‘या’ अभिनेत्रींनी निवडला दुसऱ्या क्षेत्रात कार्यरत असणारा जोडीदार

लग्नाच्या नुसत्या नावाने देखील चिडायची काजोल, मात्र अजयला भेटल्यानंतर बदलले विचार

बिकिनी घालून पोहणाऱ्या ‘या’ कोरिओग्राफरने लावली पाण्यात आग

हे देखील वाचा