Monday, June 9, 2025
Home बॉलीवूड कॅटरिना आणि विकी कौशल यांची रोका सेरेमनी संपन्न, ‘या’ दिग्दर्शकाच्या घरी गुपचूप झाला कार्यक्रम

कॅटरिना आणि विकी कौशल यांची रोका सेरेमनी संपन्न, ‘या’ दिग्दर्शकाच्या घरी गुपचूप झाला कार्यक्रम

सध्या बॉलिवूडमध्ये आनंदाचे वातावरण आहे. एकीकडे चित्रपटगृह उघडल्याचा आनंद तर दुसरीकडे कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या गोष्टी. हिंदी चित्रपटसृष्टीमधे मागील अनेक दिवसांपासून एकच मुद्दा खूप गाजतोय आणि तो म्हणजे बॉलिवूडची बार्बी डॉल कॅटरिना कैफ आणि हँडसम हिरो विकी कौशल यांचे लग्न. बरेच दिवसांपासून विकी आणि कॅटरिना यांच्या रिलेशनशिपच्या बातम्या माध्यमांमध्ये गाजत आहे.

आता या बातम्यांमध्ये अजून एक बातमी आली आहे, आणि ती म्हणजे कॅटरिना आणि विकी यांची रोका सेरेमनी झाली असल्याची माहिती मिळत आहे. कॅटरिना आणि विकी यांनी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या दोघांनी रोका केला असल्याची माहिती मिळत आहे. कॅटरिना आणि विकी यांनी का कार्यक्रम अतिशय गुप्त आणि खासगी पद्धतीने केला असल्याची माहिती आहे.

‘एक था टायगर’ आणि ‘टायगर जिंदा हैं’ फेम दिग्दर्शक कबीर खानच्या घरी दिवाळी पार्टी दरम्यान या दोघांचा हा रोका कार्यक्रम संपन्न झाला आहे. कबीर खानसोबत काम केल्यानंतर त्यांच्यामध्ये खूप चांगले बॉंडिंग तयार झाले आहे. कॅटरिना कबीर खानला तिचा भाऊ मानते. या रोका कार्यक्रमाबद्दल मिळालेल्या माहितीवरून सांगण्यात येत आहे की, अतिशय सध्या मात्र आकर्षक पद्धतीने हा कार्यक्रम झाल्याची माहिती आहे. यावेळी कॅटरिनाने सुंदर लेहेंगा घातला होता.

या रोका सेरेमनीमध्ये फक्त कुटुंबातील लोकच सामील होते. कॅटरिनाकडून तिची आई सुजेन टरकोट आणि बहीण इसाबेल कैफ तर विकीकडून त्याचे वडील श्याम कौशल, आई विना कौशल आणि भाऊ सनी कौशल उपस्थित होते. या समारंभात उपस्थित असलेल्या एका व्यक्तीच्या माहितीनुसार, कबीर खान आणि मिनी माथुर यांचे घर खूपच सुंदर पद्धतीने फुलांनी आणि लायटिंगने सजवण्यात आले होते. वर्षातील सर्वात मोठा आणि शुभ दिवस समजल्या जाणाऱ्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी का कार्यक्रम झाल्याने सर्वच खुश होते.

Photo Courtesy Instagrambollywoodkhabri

कॅटरिना आणि विकी ७ त ९ डिसेंबरच्या दरम्यान लग्न करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यावर्षी या दोघांनी मिळून दिवाळी देखील साजरी केली. त्यांना एकत्र मीडियाच्या कॅमेऱ्यांमध्ये देखील कैद करण्यात आले. हे लग्न राजस्थानमध्ये कौटुंबिक समारंभात होणार असल्याचे बोलले जात आहे. लग्नासाठी कॅटरिनाचा लेहेंगा सब्यासाची डिझाइन करत असल्याची देखील माहिती आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-भारीच ना! अक्षय कुमारच्या ‘सूर्यवंशी’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी केला ‘इतक्या’ कोटींचा टप्पा पार

-अरेरे! प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी लीक झाला ‘सूर्यवंशी’; निर्मात्यांमध्ये काळजीचे वातावरण

-‘सूर्यवंशी’ चित्रपटातील नवीन गाणं रिलीझ, ११ वर्षांनी पाहायला मिळाला कॅटरिना आणि अक्षयचा रोमँटिक अंदाज

हे देखील वाचा