कतरिना कैफ ((Katrina Kaif) ) आणि साऊथचा सुपरस्टार विजय सेतुपती ((Vijay Sethupathi) मुख्य भूमिकेत असलेल्या ‘मेरी ख्रिसमस’ (Merry Christmas) चित्रपटाविषयी बऱ्याच दिवसांपासून चर्चा होत आहे. आता ख्रिसमसच्या उत्साहात निर्मात्यांनी त्यांच्या मोस्ट अवेटेड चित्रपटाचा ट्रेलरही रिलीज केला आहे. श्रीराम राघवन यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये त्यांच्या मागील ‘बदलापूर’ आणि ‘अंधाधुन’ या चित्रपटांच्या शैलीची झलक पाहायला मिळते. अशा स्थितीत या चित्रपटाची उत्सुकता खूप वाढली आहे. बॉलिवूड आणि तमिळ चित्रपटसृष्टीतील दोन दिग्गज कलाकार कतरिना कैफ आणि विजय सेतुपती यांच्या आगामी चित्रपट ‘मेरी ख्रिसमस’ चा ट्रेलर रिलीज झाला. ट्रेलरमध्ये या दोन्ही कलाकारांच्या रोमँटिक केमिस्ट्रीने प्रेक्षकांना मोहित केले आहे.
ट्रेलरमधील सुरुवातीच्या दृश्यांमध्ये कतरिना आणि विजय एका रेस्टॉरंटमध्ये भेटतात. ते एकमेकांशी ओळखतात आणि नंतर एकमेकांच्या प्रेमात पडतात. चित्रपटात कतरिना आणि विजयचा लिपलॉक सीन देखील आहे. या सीनने प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढवली आहे. ‘मेरी ख्रिसमस’च्या ट्रेलरच्या सुरुवातीलाच एका सुंदर प्रेमकथेची सुरुवात होताना दिसत आहे. मात्र, जसजशी कथा पुढे सरकते तसतशी फसवणूक आणि कपटाची झलक दिसू लागते.
या चित्रपटाचे दिग्दर्शन श्रीराम राघवन यांनी केले आहे. या चित्रपटात कतरिना आणि विजय यांच्यासोबत संजय कपूर, विनय पाठक, प्रतिमा कन्नन आणि टिनू आनंद हे कलाकार देखील महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत. हा चित्रपट 12 जानेवारी 2024 रोजी हिंदी आणि तमिळ भाषेत प्रदर्शित होणार आहे.
View this post on Instagram
कतरिना आणि विजय या दोघांनीही या चित्रपटाबद्दल सोशल मीडियावर पोस्ट केली आहेत. हा 2 मिनिटे 20 सेकंदाचा ट्रेलर ख्रिसमसच्या आदल्या दिवशीची संध्याकाळ दाखवतो, जी कॅटरिना आणि विजय एकत्र घालवत आहेत. यानंतर दोघेही एकत्र नाताळ सुरू करतात आणि एकत्र खूप मजा करतात. प्रेक्षकांना जुन्या काळात घेऊन जाणारी अशी दृश्ये चित्रपटात पाहायला मिळत आहेत.
आधिक वाचा-
–तमन्ना भाटियाला वयाच्या 13व्या वर्षापासूनच मिळू लागलेल्या ऑफर्स, पण बॉलिवूडमध्ये फ्लॉप ठरली अभिनेत्री
–श्रेयस तळपदेला रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज, पत्नी दीप्तीने व्यक्त केला आनंद, म्हणाली…