Monday, July 1, 2024

Video: कॅटरिनाच्या ‘या’ प्रश्नावर अक्षय झाला लोटपोट, तर बिग बींनी दिले ‘असे’ एक्सप्रेशन्स

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि कॅटरिना कैफ हे सध्या त्यांच्या ‘सूर्यवंशी’ या चित्रपटाचे प्रमोशन करण्यात व्यस्त आहेत. येत्या शुक्रवारी (५ नोव्हेंबर) ते दोघे ‘कौन बनेगा करोडपती’च्या सेटवर येणार आहेत. या एपिसोडचा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये कॅटरिना असं काही बोलते की, बिग बी काही वेळासाठी अगदी शांतच बसतात.

या व्हिडिओच्या सुरुवातीला अमिताभ बच्चन, कॅटरिना कैफला शोच्या तयारीबद्दल विचारतात. त्यावेळी ती म्हणते की, तिने इतिहासातील काही वाचले आहे. भूगोल या विषयाचे थोडे ज्ञान आहे आणि गूगलवर काही गोष्टी पाहिल्या आहेत. यावेळी अक्षय कुमार म्हणतो की, तो तेच प्रश्न खेळणार ज्याची उत्तरं त्याला माहित आहे. परंतु कॅटरिना कैफ जिंकायला आली आहे. (Katrina Kaif asked this funny question to amitabh bachchan, actor got shocked)

या नंतर कॅटरिना बिग बी यांना विचारले की, “प्रत्येक लाईफलाईन आपण एकदाच वापरू शकतो की, प्रत्येक प्रश्नांच्या उत्तरासाठी वापरू शकतो.” यानंतर बिग बी यांनी असे काही हावभाव दिले जे पाहून प्रेक्षक काय तर अक्षय कुमारला देखील हसू आवरले नाही.

अक्षय नेहमीच कॅटरिनाची मजा घेत असतो. त्यावेळी तो तिला म्हणाला की, “खूपच इंटरेस्टिंग प्रश्न विचारला आहे.” यानंतर अक्षय बिग बी यांना म्हणतो की, “इतके वर्ष तुम्ही हा शो होस्ट करत आहात पण आजपर्यंत हा प्रश्न तुम्हाला कोणीच विचारला नसेल.” या आधी देखील या शोचा एक प्रोमो समोर आला होता. ज्यामध्ये कॅटरिना अमिताभ बच्चन यांना डान्स शिकवताना दिसत होती. यानंतर बिग बी तिचे खूप कौतुक करतात.

अक्षय कुमारचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘सूर्यवंशी’ जवळपास २ वर्ष वाट बघितल्यानंतर प्रदर्शित होणार आहे. कोरोना महामारीमुळे चित्रपटगृह बंद असल्याने अनेक चित्रपट प्रदर्शित झाले नाही. यातीलच ‘सूर्यवंशी’ हा एक चित्रपट आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार, अशा अनेक बातम्या येत होत्या. परंतु निर्मात्यांनी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला होता. या चित्रपटात रणवीर सिंगसोबत अजय देवगण देखील दिसणार आहे. हा चित्रपट शुक्रवारी ५ नोव्हेंबरला सर्वत्र चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-तर ‘अशा’ पद्धतीने घातली विकी कौशलने कॅटरिना कैफला लग्नाची मागणी

-रोमँटिक अंदाजात पोझ देत होते अक्षय अन् कॅटरिना, कपिल शर्मा बनला ‘कबाब में हड्डी’

-फटाक्यांची लडी असणारा ड्रेस घालत अक्षयने घेतली केबीसीमध्ये एन्ट्री, तर अमिताभ यांनी केला कॅटरिनासोबत रोमॅंटिक डान्स

हे देखील वाचा