बाॅलिवूडची ‘बार्बी डॉल’ म्हणुन ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे कॅटरिना कैफ होय. कॅटरिनाने तिच्या अभिनयाच्या जोरावर अनेक चाहत्यांची मन जिंकली आहेत. तिने चित्रपटसृष्टीला एकापेक्षा एक चित्रपट दिले आहे. कॅटरिनाचे चित्रपट पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक असतात. कॅटरिनाचा आगामी चित्रपट ‘टायगर ३’ची घोषणा झाल्यानंतर कॅटरिनाचा नवा अवतार पाण्यासाठी चाहते डोळे लावून बसले आहेत. कॅटरिनाने नुकताच केलेल्या फोटोशूट मधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.
कॅटरिनाचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यात तिने जांभळ्या रंगाचा बोट-नेक फ्लोरल प्रिंटेड शॉर्ट ड्रेस परिधान केलेला सुंदर फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना कॅटरिनाने तिचे प्रेम देखील व्यक्त केले आहे. सध्या ती ‘टायगर ३’ चित्रपटाचे शूटिंग करण्यात व्यस्त आहे. कॅटरिनाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन काही फोटो पोस्ट केले असून, यात तिने शाॅर्ट ड्रेस घातलेला दिसत आहे. या फोटोमध्ये तिच्या अंगावर सुर्याची किरणे पडलेली दिसत असून, त्या सोनेरी किरणांमुळे तिचे सौंदर्य आणखी खुलून आले आहे.
फोटो शेअर करताना कॅटरिनाने लिहिले की,“माझ तुझ्यावर प्रेम आहेत.” सध्या कॅटरिना तुर्कीमध्ये आहे आणि तिने या देशाबद्दलचे प्रेम व्यक्त केले आहे. ती तुर्कीमध्ये आगामी चित्रपटाचे शूटिंग करत आहे. अलीकडेच बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान सोबत तिने तुर्कीचे संस्कृती आणि पर्यटन मंत्री मेहमेत नूरी एर्साय यांची भेट घेतली.
दरम्यान, कबीर खान यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट‘एक जा टायगर’चा पहिला भाग २०१२ मध्ये प्रदर्शित झाला. यानंतर २०१७ मध्ये अली अब्बास जफर दिग्दर्शित दुसरा भाग‘टायगर जिंदा है’ प्रदर्शित झाला आणि तिसर भाग मनीष शर्मा यांनी दिग्दर्शित केला असुन कोव्हिड-१९च्या प्रादुर्भावामुळे स्थगिती करण्यात आला होता. मात्र, हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. हा आगामी चित्रपट पाहणे अत्यंत रंजक ठरणार आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यनंतर एजाज खानने मागितली माफी; म्हणाला, ‘जर मी तुझ्याशी…’
-कधी ओपन शर्ट, तर कधी जंगलात बिकीनी घालून पोझ देतेय अदाकारा; वेड लावतोय मौनीचा हा कातीलाना अंदाज