अफ़गान जलेबी, माशूक फ़रेबी! बॉलीवूडची चिकणी चमेली कॅटरिनाने लावले जोरदार ठुमके, पाहा व्हिडीओ


बॉलीवूडची चिकणी चमेली कतरीनाने कमी कालावधीतच कलाविश्वात तिचा दबदबा निर्माण केला होता. आपल्या मेहनतीच्या जोरावर या परदेशी अभिनेत्रीने आपली वेगळी अशी छाप चाहत्यांच्या मनावर पाडली. आपल्या मनमोहक हास्याणे प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेणारी ही अभिनेत्री काही वेळेपासून प्रेक्षकांच्या नजरेआड झाली होती. आता ती पुन्हा एकदा जुन्या व्हिडीओमुळे चर्चेचा विषय बनली आहे.

कॅट आपल्या अभिनयात तर जबरदस्त तर आहेच, पण त्यासोबतच आपल्या नृत्याने देखील ती लाखो प्रेक्षकांची मने जिंकत असते. अलीकडेच तिचा एक जुना व्हिडिओ खूपच व्हायरल होत आहे, ज्यात ती ‘अफगान जलेबी’ या गाण्यावर जबरदस्त अंदाजात नाचताना दिसत आहे. कटरीनाचा हा व्हिडीओ एका फिल्मफेअरने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे, जो आतापर्यंत पन्नास हजाराच्या आसपास लोकांनी पाहिला आहे.

तिच्या एका मित्राच्या लग्नसोहळ्यात कॅटरिनाने अगदी घरच्या व्यक्तींप्रमाणे आनंद घेतला. निळ्या रंगाच्या लेहंग्यामध्ये कतरिनाने ‘अफगाण जिलेबी’ या गाण्यावर भन्नाट डान्स केला. आपल्या मोहक अदांनी तिने सर्वांना घायाळ केले होते. तिचा हा डान्स व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून तिचे चाहतेही तिचे भरभरून कौतुक करतायत.

कतरीनाने २००३ मध्ये गुलशन ग्रोव्हर आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘बुम’ या चित्रपटातुन बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर तिने २००४ मध्ये ‘मल्लिस्वरी’ हा तेलुगू सिनेमा साइन केला होता. यात तिच्यासोबत वेंकटेश हा सुपरस्टार होता. नंतर २००५ मध्ये ‘अल्लारी पिदुगु’ आणि २००६ मध्ये एका मल्याळम चित्रपटात देखील तिने काम केले होते. सोबतच तिचे वेलकम, अजब प्रेम की गजब कहाणी, बार बार देखो, एक था टायगर, जब तक है जान आणि झिरो हे चित्रपट देखील विशेष गाजले.

कतरीना सध्या आपल्या आगामी ‘सूर्यवंशी’ या चित्रपटांमध्ये अक्षय कुमारसोबत काम करत असून, या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे. अनेक वर्षानंतर हे दोघे एकाच चित्रपटांमध्ये झळकणार आहेत. रोहित शेट्टी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. याशिवाय ती भुत या सिनेमात देखील दिसणार आहे. तिच्यासोबत ईशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदी हे सुद्धा प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

 


Leave A Reply

Your email address will not be published.