Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

कॅटरिना कैफला विकी कौशलच्या आईकडून मिळालं स्पेशल गिफ्ट! लग्नाच्या बातम्यांनी धरला जोर

गेल्या काही दिवसांपासून विकी कौशल आणि कॅटरिना कैफच्या लग्नाच्या बातम्या येत आहेत. या लग्नाच्या बातमीवर दोन्ही कलाकारांनी कोणतेही अधिकृत वक्तव्य दिलेले नाही. पण तरीही लग्नाचे ठिकाण आणि मेनू समोर येत आहे. दरम्यान, आता दिवाळीनिमित्त विकी कौशलच्या आईने कॅटरिना कैफसाठी खास गिफ्ट पाठवल्याची माहिती समोर आली आहे.

कॅटरिनाला मिळाले गिफ्ट आणि लिफाफा
बॉलिवूडचे चर्चित जोडपे विकी कौशल आणि कॅटरिना कैफ हे त्यांच्या प्रेमकथेमुळे सतत माध्यमांच्या हेडलाईनमध्ये असतात. दरम्यान, आणखी एक बातमी समोर आली आहे. माध्यमातील वृत्तानुसार, विकी कौशलच्या आईने तिची भावी सून कॅटरिनाला काही खास भेटवस्तू आणि सोबतच शगुनचा एक लिफाफा पाठवला आहे. (katrina kaif gets diwali omen from vicky kaushals mother rumors of marriage intensify again)

दिवाळी पार्टीमध्ये एकत्र दिसले कपल
नुकतेच कॅटरिना कैफ आणि विकी कौशल आरती शेट्टीच्या घरी झालेल्या दिवाळी पार्टीत एकत्र पोहोचले होते. या इव्हेंटचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये कॅटरिना गुलाबी रंगाच्या साडीत आणि विकी गडद निळ्या रंगाच्या कुर्त्यामध्ये दिसला. पण या फोटोंमध्ये ही शगुनची बातमी समोर आली आहे ज्यामुळे त्यांच्या लग्नाच्या बातमीवर शिक्कामोर्तब झाला आहे.

भावी सासू, विकी कौशलची आई वीणा कौशल यांनी कॅटरिनाला या शगुनमध्ये, हाताने बनवलेले डार्क चॉकलेट, काही स्नॅक्स, दागिने, शगुन लिफाफा आणि साडी भेट दिली आहे. खरं तर, कॅटरिनाला डार्क चॉकलेट खूप आवडतात.

अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर कॅटरिना-विकीच्या लग्नाची चर्चा सुरू आहे, मात्र दोन्ही स्टार्स याला केवळ अफवा असल्याचे सांगत आहेत. पण यानंतरही, बातम्यांचा दावा आहे की, विकी आणि कॅटरिना ७ ते ९ डिसेंबर २०२१, दरम्यान राजस्थानमधील ‘सिक्स सेन्सेस बरवारा फोर्ट’मध्ये लग्न करणार आहेत. एवढेच नाही, तर त्यांच्या लग्नाचे कपडे प्रसिद्ध डिझायनर सब्यसाची मुखर्जी डिझाईन करत असल्याचीही बातमी आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सिल्व्हर रंगाच्या शिमरी गाऊनमधे करिश्मा कपूरचा घायाळ करणारा अंदाज पाहिला का?

-‘दिल तो पागल है’ला २४ वर्षे पुर्ण: कोणाचीही हिंमत नसताना, माधुरीला टक्कर देण्यास तयार झाली होती करिश्मा

-करीनाचा चिमुकला जेह दिसला आत्या सबाच्या मांडीवर खेळताना; पाहा ‘हा’ गोंडस फोटो

हे देखील वाचा