Wednesday, October 15, 2025
Home बॉलीवूड शूटिंग सोडून तुर्कीमध्ये ‘हे’ काम करताना दिसली बॉलिवूडची ‘बार्बी गर्ल’, व्हिडिओ शेअर करत म्हणतेय…

शूटिंग सोडून तुर्कीमध्ये ‘हे’ काम करताना दिसली बॉलिवूडची ‘बार्बी गर्ल’, व्हिडिओ शेअर करत म्हणतेय…

बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ ही सध्या तुर्कीमध्ये आहे. तिच्या ब्लॉकबस्टर ‘टायगर’ फ्रँचायझीच्या तिसऱ्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी ती गेली आहे. या ऍक्शन सीरिजमध्ये अभिनेता सलमान खान मुख्य भुमिकेत आहे. त्याचबरोबर कॅटरिना देखील या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे. याच शूटिंगमध्ये ती अनेकदा व्यस्त दिसते. ती तिच्या इंस्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून तिच्या दैनंदिन दिनक्रमाविषयी माहिती देत असते.

काही दिवसांपूर्वीच कॅटरिनाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओमध्ये ती तुर्कीतील एका मार्टमध्ये खरेदी करताना दिसत आहे. इंस्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करताना तिने लिहिले, “सुपरमार्केटमध्ये खरेदी केल्याने मला खूप उत्साह वाटतो.” या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, कॅटरिना कैफ दुकानाच्या अनेक भागात फिरत आहे. (katrina kaif is unusually excited while grocery shopping in turkey as she takes a break from tiger 3 shooting)

यापूर्वी कॅटरीनाने एक फोटोही पोस्ट केला होता, ज्यामध्ये ती निसर्गाचा आनंद घेत होती. कॅटरिना हुडी आणि जीन्समध्ये दिसली होती. रशियाचे वेळापत्रक पूर्ण करून ‘टायगर ३’ ची टीम नुकतीच तुर्कीला गेली आहे. असे म्हटले जात आहे की, सलमान आणि कॅटरिना तुर्कीमध्ये एका गाण्याचे चित्रीकरण करत आहेत. क्रूसोबत सलमानचा भाचा आणि सोहेल खानचा मुलगा निर्वाणही आहे. सलमान खान सोशल मीडियावर निर्वाणसोबत अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत आहे. कॅटरिना कैफ तिच्या अभिनय आणि ग्लॅमरस अंदाजामुळे सोशल मीडियावरही लोकप्रिय आहे. तिच्या स्टाईल आणि फिटनेसमुळे तिने तिची खास ओळख निर्माण केली आहे.

काही दिवसांपूर्वीच कॅटरिनाने चित्रपट निर्माते श्रीराम राघवनच्या पुढील चित्रपटात काम सुरू केल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. चित्रपटाबद्दल नवीन बातमी अशी आहे की, कॅटरिना लवकरच चित्रपटासाठी वाचन सुरू करेल आणि चित्रपट निर्मात्यासोबत तिच्या पात्राला समजून घेण्यासाठी आणि जुळवून घेण्यासाठी वेळ देईल. याशिवाय ती लवकरच सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टरसोबत ‘फोन भूत’ मध्ये दिसणार आहे. तसेच, ती ‘सूर्यवंशी’ या चित्रपटात दिसणार आहे. त्याचबरोबर कॅटरिना कैफ शेवटची ‘भारत’ चित्रपटात दिसली होती.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-रात्री झोपताना कोणीतरी दाबायचे हेमा मालिनींचा गळा; अभिनेत्रीने सांगितली ‘झपाटलेल्या’ घराची कहाणी

-मलायका अरोराला आवडतो ‘अशा’प्रकारचा व्यक्ती, मिलिंद सोमणपुढे केला खुलासा

-निधन झाले गायिकेचे, पण सपना चौधरीलाच ठरवले मृत; अफवेने उडाली होती कुटुंबीयांची झोप

हे देखील वाचा