आता कोणाचा विश्वास बसणार नाही, पण एकेकाळी सर्वात लाजाळू आणि घाबरट होती बार्बी डॉल कॅटरिना कैफ


अभिनेत्री कॅटरिना कैफ हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. परदेशी असुनही आपल्या सहजसुंदर अभिनयाने आणि सौंदर्याने कॅटरिना कैफने बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. अनेक सुपरहिट चित्रपटात कॅटरिनाने काम केले असून हिंदी चित्रपट जगतातील आघाडीच्या सर्व अभिनेत्यांसोबत ती चित्रपटात झळकली आहे. परंतु चित्रपटात बिनधास्त आणि दमदार अभिनय करणारी कॅटरिना याआधी मात्र खूप लाजाळू होती. घरी पाहुणे आले तरी ती बोलायला घाबरत असे, असा चकित करणारा खुलासा खुद्द कॅटरिना कैफने एका कार्यक्रमात बोलताना केला आहे.

अभिनेत्री कॅटरिना कैफ बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. आपले घायाळ करणारे सौंदर्य आणि सहजसुंदर अभिनयामुळे ती चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत असते. सोशल मीडियावरसुद्धा कॅटरिनाचा खुप मोठा चाहता वर्ग आहे. कॅटरिना कैफ अभिनयाबरोबरच लूक आणि फिटनेसबाबत ही सतत चर्चेत असते. परंतु सध्या चित्रपटसृष्टी गाजवून सोडणारी कॅटरिना बालपणी मात्र प्रचंड लाजाळू होती. लोकांना बघताच ती आईच्या पाठीमागे लपून बसायची याबाबतचा खुलासा खुद्द कॅटरिना कैफने केला आहे.

अलीकडेच अभिनेत्री कॅटरिना कैफ ‘किस्सा ख्वाबों का’ या ऑडिओ कार्यक्रमात तिच्या आयुष्यासंबंधित रंजक गोष्टी, किस्से ऐकवताना दिसून आली होती. यावेळी बोलताना कॅटरिना कैफ म्हणाली की, “वयाच्या १४व्या वर्षापर्यंत मी खूपच लाजाळू होते. यावेळी मी इतकी लाजाळू होती की माझ्या जवळपास कोणी लोकं आले की मी आईच्या कुशीत स्वतःला लपवायची. इतकेच नव्हे तर कोणी येताना दिसले की मी आईच्या कंबरेला कवटाळून स्वतःचा चेहरा तिच्या कुशीत लपवायची.”

कार्यक्रमात कॅटरिना कैफने आपल्या अभिनयाबद्दल ही अनेक गोष्टी चाहत्यांना सांगितल्या. ती पुढे म्हणाली की “खुप जण म्हणतात की, मी ब्लॉकबस्टर अभिनेत्री आहे मी इतकीही चांगली अभिनेत्री नाही. पण मला यामुळे काही फरक पडत नाही. मला असे वाटत की जे काम मी करतेय तेच माझ्यासाठी अद्भुत आहे” असेही ती यावेळी म्हणाली. इतकेच नव्हे तर कॅटरिना कैफच्या मते तिचा आत्मपरीक्षणावर विश्वास आहे आणि प्रत्येकाने आत्मपरीक्षण केले पाहिजे.

दरम्यान, १६ जुलै १९८३ रोजी हाँगकाँग मध्ये कॅटरिना कैफचा जन्म झाला. ‘मैंने प्यार क्यूं किया’ आणि ‘नमस्ते लंडन’ चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. सुपरस्टार सलमान खान सोबतचा ‘एक था टायगर’ चित्रपटातील कॅटरिनाच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक झाले होते. आजच्या घडीला कॅटरिना कैफ हिंदी चित्रपट क्षेत्रातील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री असून, तिच्या आणि अभिनेता विकी कौशलच्या प्रेम प्रकरणाची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-काय सांगता! प्रियांका चोप्राला एका माकडाने मारली होती थोबाडीत

-जेव्हा अजय देवगणने पहिल्या भेटीतच काजोलला केले होते रिजेक्ट, तिला पुन्हा भेटायची नव्हती त्याची इच्छा

-राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार: रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार; तर कंगणा, धनुष, मनोज बाजपेयी ठरले सर्वोत्कृष्ट कलाकार


Leave A Reply

Your email address will not be published.