भारतात कोरोनाची दुसरी लाट आल्याचे आता जवळपास निश्चित झाले आहे. या लाटेत अबालवृद्धांसह अनेक वयोगटातील नागरिक बाधित होताना दिसत आहे. याच लाटेचा फटका बॉलिवूडलाही बसला असून अनेक कलाकार कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत.
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफ ही देखील कोरोना पॉझिटिव्ह झाली आहे. याबाबतची माहिती कतरिनाने स्वतः सोशल मीडिया अकाउंटवर दिली आहे.

कतरिनाने तीच्या पोस्टमध्ये कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर स्वतःला आयसोलेट करुन घेतले असल्याचे सांगितले आहे. तसेच संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करावी, असेही आवाहन तिने इतरांना केले आहे. तसेच आपण कोरोना नियमांचे पालन करत असल्याचेही तीने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
याअगोदरही अनेक कलाकार कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. एकामागोमाग एक सेलिब्रेटी कोरोनाच्या विळख्यात सापडत असल्याने चाहत्यांच्या चिंतेत भर पडत आहे.