कॅटरिना कैफ ही बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने काही केले तरी ते लगेचच सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनते. सध्या कॅटरिना तिच्या आगामी ‘सूर्यवंशी’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. पण यासोबतच ती विकी कौशलसोबतच्या लग्नामुळे सतत चर्चेत असते. वृत्तांवर विश्वास ठेवला, तर दोघेही डिसेंबरमध्ये लग्न करणार असल्याचे म्हटले जात आहे. पण या सगळ्यामध्ये कॅटरिना सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल होत आहे.
‘या’ कारणामुळे होतेय ट्रोल
सोशल मीडियावर कॅटरिनाला तिच्या लूकबद्दल खूप काही बरे वाईट ऐकवले जात आहे. तिने अलीकडेच तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिचे हे फोटो शेअर होताच व्हायरल झाले आणि ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली. युजर्स कॅटरिना कैफला तिच्या चेहऱ्यासाठी आणि ओठांसाठी खूप ट्रोल करत आहेत. (katrina kaif trolled on social media people said botox and surgery ruined her face completely)
युजर्स म्हणाले, ‘चेहरा बिघडवलाय’
बॉलिवूड स्टार्सना केवळ त्यांच्या अभिनयाच्या आधारावर जज केले जाते असे नाही, तर प्रेक्षक त्यांना त्यांच्या लूकसाठी अनेकदा ट्रोल देखील करतात. कॅटरिना कैफचे लाखो चाहते आहेत. तिच्या अभिनयासोबतच तिचा लूकही चाहत्यांना खूप आवडतो. पण आता तिच्या लूकसाठी युजर्स तिला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करत आहेत. युजर्स म्हणतायेत की, “प्लास्टिक सर्जरी आणि बोटॉक्समुळे तुझा चेहरा पूर्णपणे विद्रूप झाला आहे.”
यापूर्वीही झालीय ट्रोल
कॅटरिना कैफ तिच्या लूकसाठी सोशल मीडियावर ट्रोल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही जेव्हा तिचा लूक बदलला होता, तेव्हा नेटकऱ्यांनी तिला चांगलेच सुनावले होते. कॅटरिनाच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले, तर ती लवकरच अक्षय कुमारसोबत ‘सूर्यवंशी’ आणि सलमान खानसोबत ‘टायगर ३’ मध्ये दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-विकी कौशल आणि कॅटरिना राजस्थानमध्ये राजेशाही थाटात करू शकता लग्न, डेस्टिनेशन वेडिंगचा प्लॅन रद्द
-रोमँटिक अंदाजात पोझ देत होते अक्षय अन् कॅटरिना, कपिल शर्मा बनला ‘कबाब में हड्डी’










