Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

जेव्हा करीनाने कॅटरिनाला म्हटले होते आपली ‘वहिनी’, पाहण्यालायक होती रणबीरची रिऍक्शन

बॉलिवूडची ‘शीला’ म्हणजेच कॅटरिना कैफ होय. ती सध्या कोणत्याही नवीन चित्रपटामुळे नाही, तर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत आहे. कॅटरिनाचे नाव बऱ्याच काळापासून विकी कौशलशी जोडले जात आहे. सध्या अशा बातम्या समोर आल्या आहेत की दोघांनीही साखरपुडा केला आहे. यासोबतच विकी आणि कॅटरिनाची काही फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. परंतु ही माहिती पूर्णपणे चुकीची आहे.

करीनाने कॅटरिनाला म्हटले होते वहिनी
व्हायरल होत असलेल्या फोटोबद्दल कॅटरिनाच्या टीमने हे स्पष्ट केले आहे की, हे सर्व खोटं आहे. हे फोटो जे व्हायरल होत आहेत, ते एका पार्टीतील जुने फोटो आहेत. त्याचवेळी, चाहते हे प्रत्यक्षात लवकरात लवकर घडण्याची वाट पाहत आहेत आणि कॅटरिना मिसेस कौशल होईल. मात्र, एक काळ होता जेव्हा कॅटरिना कपूर कुटुंबाची सून होणार होती. करीना कपूर खानने स्वतः कॅटरिनाला तिची वहिनी म्हणून सांगितले होते. (Katrina Kaif was once called ‘sister-in-low’ by Kareena.)

त्याचे झाले असे की, करीना आणि रणबीर ‘कॉफी विथ करण’च्या एका एपिसोडमध्ये एकत्र आले होते. तेथे करणने करीनाला विचारले होते की, ती कोणती अभिनेत्री आहे ज्यांच्यासोबत करीनाला रोमँटिक व्हायचे असेल, तर तिला अडचण येणार नाही? यावर करीना म्हणाली होती, “जर असे झाले, तर मी माझ्या भावी वहिनी कॅटरिनासोबत जास्त मोकळेपणाने असू शकेल.”

करीनाचे हे उत्तर ऐकून करणला धक्काच बसला होता. एवढेच काय रणबीर सुद्धा आश्चर्यचकित होऊन हसू लागला होता. यासोबतच तिने असेही म्हटले होते की, त्याचे मन ‘भाभी’ या शब्दावर अडकले आहे. करीनाकडून हे ऐकून प्रत्येकाला वाटले की, आता कॅटरिना आणि रणबीर नक्कीच लग्न करतील. मात्र, तसे झाले नाही, तर काही दिवसांनी रणबीर-कॅटरिनाचे ब्रेकअप झाले.

सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे एकदा‘कॉफी विथ करण’ मध्येच कॅटरिना म्हणाली होती की, तिला वाटते की ती विकी कौशलसोबत पडद्यावर चांगली दिसेल. यानंतर, जेव्हा विकी कौशलला याबद्दल त्याचे मत विचारले, तेव्हा तो सोफ्यावर आनंदाने बेशुद्ध झाला. यानंतर काही वेळातच विकी आणि कॅटरिनाच्या अफेअरच्या बातम्यांनीही जोर धरला होता. तरीही दोघांनी अजूनही त्यांच्या नात्याची बातमी अधिकृतपणे जाहीर केलेली नाही.

रणबीरबद्दल बोलायचे झाले, तर आजकाल तो आलियासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. रणबीर आणि आलिया ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटामुळे दोघांमधील जवळीक वाढली होती. आलिया आणि रणबीर लवकरच लग्न करणार असल्याच्या बातम्याही येत आहेत. सध्या रणबीर आलियावर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-भारीच ना! ‘बबड्या’ अन् ‘शुभ्रा’ची जोडी ‘या’ प्रोजेक्टमधून पुन्हा एकदा येणार प्रेक्षकांच्या भेटीला

-सरिता माधवनने लिहिले, ‘बायको नेहमीच बरोबर असते’, यावर माधवन म्हणतो, ‘नक्कीच मात्र ….

-देखा हजारो दफा आपको! ऋतुजा बागवेचा साडीतील साधेपणा पाहून चाहत्यांची बत्ती गुल

हे देखील वाचा