Tuesday, August 5, 2025
Home बॉलीवूड कॅटरिना कैफच्या वाढदिवसाचा केक घेऊन डिलिव्हरी बॉय आला घरी, अभिनेत्रीने दिली ऑफर; तर…

कॅटरिना कैफच्या वाढदिवसाचा केक घेऊन डिलिव्हरी बॉय आला घरी, अभिनेत्रीने दिली ऑफर; तर…

बाॅलिवूडची ‘बार्बी डॉल’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे कॅटरिना कैफ. बाॅलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफने तिच्या अभिनयाच्या जोरावर अनेक चाहत्यांची मने जिंकली आहेत. देशातच नव्हे, तर परदेशातही तिची जबरदस्त फॅन फोलविंग आहे. कॅटरिनाची एक झलक पाहण्यासाठी अनेक चाहते कावरेबावरे होतात. कॅटरिना तिच्या चाहत्यांसोबत अनेक वेगवेगळ्या पोझमध्ये सेल्फी काढताना दिसते. मात्र, यावेळी तिचा एक असा व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती कॅटरिनाचे बोलणे टाळताना दिसत आहे. यात स्पष्ट दिसत आहे की, कॅटरिना कितीही मोठी स्टार असली, तरीही फूड डिलिव्हरी बॉयला थोडाही फरक पडत नाही.

खरं तर, ही एक फूड डिलिव्हरी ऍपची ऍड आहे. ज्यामध्ये एक फूड डिलिव्हरी बॉय कॅटरिनाच्या घरी केक घेऊन जातो. कॅटरिना डिलिव्हरी बॉयला पाहून म्हणते की, “माझ्या वाढदिवशी फक्त तू वेळेवर येतो. मी तुला केक चारल्याशिवाय जाऊ देणार नाही.” कॅटरिना केक आतमध्ये घेऊन जाते. मात्र, त्याचवेळी डिलिव्हरी बॉयला पुढील ऑर्डरचा मेसेज येतो. ज्यामुळे डिलिव्हरी बॉय केक खाल्याशिवाय निघून जातो. अभिनेत्री बाहेर येऊन पाहते, तोवर डिलिव्हरी बॉय निघून गेलेला असतो.

या व्हिडिओद्वारे फूड डिलिव्हरी कंपनीने सर्वांना कामाविषयी जागरूक आणि सर्वांना समानभावना असल्याचे दाखवून दिले आहे. हा व्हिडिओ शेअर करताना कॅटरिनाने लिहिले की, “झोमॅटो, कृपया त्याला माझ्या पुढील ऑर्डरवरही पाठवा? यावेळी मी केक आधीच हातात ठेवेल.” या व्हिडिओवर युजर्स अनेक प्रतिक्रिया देत आहेत. अनेकजण तिची खिल्ली उडवत आहेत.

कॅटरिनाने तिचा हा व्हिडिओ स्वतःच्या इंस्टाग्रामवर अकाऊंट वरुन शेअर केला आहे. व्हिडिओत तिने पिवळ्या रंगाचा फॅन्सी शाॅर्ट ड्रेस परिधान केला आहे. केस पूर्ण मोकळे सोडले आहे, तर अगदी हलकासा मेकअप केला आहे. त्यामुळे कॅटरिना प्रचंड सुंदर दिसत आहे.

कॅटरिनाविषयी बोलायचं झालं, तर कॅटरिना सध्या ‘टायगर ३’ चित्रपटाचे शूटिंग करण्यात व्यस्त आहे. ‘टायगर ३’चे शूटिंग रशियात सुरू आहे. कॅटरिनासोबत सलमान खानही रशियाला रवाना झाला आहे. रशियातील अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. ‘टायगर ३’च्या सेटवरील कॅटरिनाचा एक फोटो प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यात तिने लाल आणि काळ्या रंगाचा स्वेटशर्ट परिधान केला आहे. तसेच न्यूड मेकअप केला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अबब! मौनी रॉयने बिकिनीमध्ये केला इंटरनेटवर कहर, बोल्ड अंदाज पाहून चाहतेही झाले हैराण

-Bigg Boss OTT: शोवर भडकली माजी स्पर्धक सोफिया हयात; म्हणाली ‘करण जोहर सलमान खानपेक्षाही वाईट…’

-जेव्हा शाहरुख खानला महिला चाहती म्हणाली होती, ‘आय लव्ह यू अक्षय’; रंजक आहे ‘तो’ किस्सा

हे देखील वाचा