बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ हिला कोरोनाची लागण झाली आहे. नुकतेच तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून ही माहिती दिली आहे की, ती कोविड पॉझिटिव्ह आहे आणि ती सध्या होम क्वारंटाईन आहे. कॅटरिना सध्या तिच्या ‘टायगर 3’ या चित्रपटाची शूटिंग करत होती. आता जेव्हा तिला कोरोना झाला आहे, तेव्हा सगळेजण असे म्हणत आहे की, सेटवरील सगळ्यांना देखील कोरोनाची लागण झाली असू शकते. त्यामुळे या चित्रपटाच्या शूटिंगवर खूप परिणाम होऊ शकतो. परंतु ताज्या बातमीनुसार वेगळेच काही समोर आले आहे.
पिंकविलाच्या माहितीनुसार, चित्रपटाच्या शूटिंगमध्ये कोणताच बदल केला जाणार नाही. सगळं काही तसंच होणार आहे जे आधी पासून ठरवलं होतं. सलमान खान सध्या मुंबई मधील यशराज स्टुडिओमध्ये शूटिंग करत आहे, तर या महिन्याच्या शेवटी कॅटरिनाची शूटिंग होणार आहे. हे बदल कॅटरिनाला कोव्हिड झाल्यामुळे नाही, तर या गोष्टी आधीपासून अशाच ठरवल्या होत्या. त्यामुळे ‘टायगर 3’ च्या शूटिंगमध्ये काहीही बदल होणार नाहीये. त्यामुळे सलमान खान आता त्याची शूटिंग करत आहे.
कॅटरिना कैफपूर्वी अनेक बॉलिवूड कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. यात अक्षय कुमार, भूमी पेडणेकर, विकी कौशल, आलिया भट्ट ,रणबीर कपूर, आमिर खान यांसारख्या अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाली होती.
Feeling bad to hear the news. Katrina Kaif Covid 19 test positive. I pray to Allah Ta'ala to Get Well back very soon.❤️
#KatrinaKaif #Corona pic.twitter.com/pgyMGTRWia— AQEEL AKHTAR ???? (@AqeelAkhtarP) April 7, 2021
मंगळवारी (6 एप्रिल) कॅटरिनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीला पोस्ट केले होते की, “माझा कोरोना रिपोर्ट पोझिटिव्ह आला आहे. आणि मी आता घरातच क्वारंटाईन आहे. डॉक्टरांनी दिलेल्या सगळ्या नियमांचे मी पालन करत आहे. माझी ही विनंती आहे की, जे कोणी माझ्या संपर्कात आले आहेत. त्यांनी त्यांची चाचणी लवकरात लवकर करून घ्या. तुम्ही दिलेल्या प्रेमासाठी आणि सपोर्टसाठी खूप धन्यवाद. सुरक्षित राहा काळजी घ्या.”
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘मॉर्डन रांझा’ गाण्यावर नेहा कक्करने लावले ठुमकेे; चाहत्यांसह पती रोहनप्रीत सिंगनेही केले कौतुक!