Monday, July 1, 2024

‘केबीसी १३’मध्ये असे काय झाले की, अमिताभ बच्चन यांनी निर्मात्यांकडे केली शो बंद करण्याची विनंती?

टीव्हीवर आतापर्यंत अनेक शो आले आणि गेले. मात्र, यातील काही शो असे होते आणि आहेत, ज्यांनी प्रेक्षकांसोबत एक वेगळंच नातं तयार केलं होतं. यापैकीच एक शो म्हणजे ‘कौन बनेगा करोडपती’ होय. या शोचे सध्या १३ वे पर्व सुरू आहे. यामध्ये तिसरे पर्व सोडले तर आतापर्यंत सर्व पर्व ‘महानायक’ अमिताभ बच्चन यांनी होस्ट केले आहेत. १३ व्या पर्वातही बिग बी प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. त्यांचे प्रत्येकवेळी नवीन रूप पाहायला मिळत असते. नुकतेच केबीसी १३ च्या लेटेस्ट प्रोमोमध्ये बिग बी शोची स्पर्धक नम्रता शाहबरोबर फ्लर्ट करताना दिसत आहेत. नम्रताही त्यांना प्रत्युत्तर देताना दिसत आहेत. अशातच बिग बींनी निर्मात्यांना शो बंद करण्यास सांगतात. व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला ‘सिलसिला’ चित्रपटातील गाणेही ऐकायला मिळत आहे.

बिग बींनी केले मनोरंजन
सोनी एन्टरटेन्मेंटने टीव्हीवर केबीसी ३चा मजेशीर प्रोमो प्रदर्शित केला आहे. या प्रोमोत होस्ट बिग बी निर्मात्यांना शो बंद करण्यास सांगताना दिसत आहेत. जेणेकरून  ते नम्रता शाह यांच्यासोबत चहा पिण्याचा आनंद लुटू शकतील. (Kaun Banega Crorepati 13 Amitabh Bachchan Flirts With Contestant And Ask Makers Let Them Go For Tea Date)

बिग बींनी केली नेकलेसचीही प्रशंसा
प्रोमोच्या सुरुवातीला बिग बी नम्रता यांना म्हणतात की, त्या खूपच सुंदर आहेत. यानंतर ते त्यांच्या नेकलेसचीही प्रशंसा करतात. नम्रता त्यांना विचारतात की, त्या त्यांना ‘अमित जी’ असे म्हणू शकतात का? यावर बिग बी ‘अमित’ असे म्हणायला सांगतात. यानंतर ते म्हणतात की, “प्रोड्यूसर जी हा कार्यक्रम बंद करा. मला नम्रता यांच्यासोबत चहा प्यायला जायचे आहे.”

नजर एका जागेवर असेल, तर चक्कर येत नाही
कथ्थक डान्सर नम्रता ‘घर मोरे परदेसिया’ गाण्यावरही डान्स करताना दिसतात. यावर बिग बी म्हणतात की, “इतक्या वेळा फिरावे लागते, चक्कर येत नाही का?” यावर नम्रता प्रत्युत्तर देत म्हणतात की, “नजर एका जागेवर असेल, तर चक्कर कधीच येत नाही.” यानंतर बिग बींच्या तोंडून निघते, “हैं…?” यानंतर नम्रता बिग बींना म्हणतात की, “तुम्ही किती तरुण दिसत आहात.” यानंतर बिग बी लाजतात.

या व्हिडिओला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत या व्हिडिओला ७ हजारांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-लईच वाईट झालं! वयाच्या २५ व्या वर्षी मराठी अभिनेत्री ईश्वरी देशपांडेचा अपघातात मृत्यू

-‘पुरुषाचे शरीर’, म्हणणाऱ्या युजरला तापसी पन्नूचे खणखणीत प्रत्युत्तर; म्हणाली, ‘फक्त ही ओळ लक्षात ठेव…’

-‘बिग बॉस मराठी’तील ‘या’ स्पर्धकाचा झालाय दोनदा घटस्फोट, घरात करावा लागतोय पहिल्या पतीशी सामना

हे देखील वाचा