Monday, July 1, 2024

आमचाच दरारा! दीपिका अन् फराहने लावली ‘केबीसी’मध्ये हजेरी; चक्क ‘बिग बीं’नाही द्यावे लागले ऑडिशन

सोनी टीव्हीवरील प्रसिद्ध रियॅलिटी शो ‘कौन बनेगा करोडपती’ हा प्रेक्षकांचा सर्वात आवडत्या शोपैकी एक शो आहे. ‘केबीसी’च्या १३ व्या पर्वामध्ये सहभागी होणारे स्पर्धक लाखो आणि करोडो रुपये जिंकत आहेत आणि त्यांच्यासोबत घरी घेऊन जात आहेत. हा शो केवळ स्पर्धकांचे भाग्य बदलणार नाही, तर  टीव्हीवरील प्रत्येक प्रेक्षकांमध्ये याबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण करणारा आहे. काही मोठी व्यक्तिमत्व किंवा सामान्य लोक या शोमध्ये येत राहतात. अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि फराह खान आगामी भागांमध्ये दिसणार आहेत.

‘केबीसी’च्या या नव्या प्रोमोमध्ये दीपिका आणि फराह खान अमिताभ बच्चनसोबत खूप मजा करताना दिसणार आहेत. यादरम्यान शोचे होस्ट अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोणसह ‘ओम शांति ओम’मधील ‘एक चुटकी सिंदूर’ हा प्रसिद्ध डायलॉग पुन्हा म्हणताना दिसत आहेत. दरम्यान ‘महानायक’ अमिताभ बच्चन यांना स्टेजवर ऑडिशन द्यावे लागले. प्रोमोमध्ये असे दिसत आहे की, शोचे होस्ट अमिताभ बच्चन फराहकडे तक्रार करत आहेत. अमिताभ फराहला म्हणतात, “तुम्हाला मला चित्रपटात कास्ट करावे असे कधी वाटले नाही का?”

त्यानंतर दीपिका अमिताभ यांना डायलॉग म्हणायला शिकवते. त्यांचा हा सीन २ ते ३ वेळा केला. इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर करत सोनी टीव्हीने लिहिले की, “फराह सहकलाकार दीपिकासोबत एबी सरांची ऑडिशन घेत आहे. तेही ऑडिशन पास होतील का? केबीसी १३ चा शुक्रवार (१०सप्टेंबर) विशेष भागामध्ये ऑडिशनचा सर्वात मजेदार क्षण रात्री ९ वाजता पाहा.”

दरम्यान, माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग आणि सौरव गांगुली शुक्रवारी शोमध्ये दिसले. कोरोना महामारीमुळे शोमध्ये कडक खबरदारी घेतली जात आहे. त्यामुळे स्पर्धक आणि शोचे होस्ट यांच्यातील अंतर राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. पण या पर्वात येणाऱ्या स्पर्धकांना अमिताभ यांना मिठी मारता येत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘सोनालीची झलक सबसे अलग!’ अभिनेत्रीच्या साडीलूकने चाहत्यांना केलं डायरेक्ट ‘क्लीन बोल्ड’

-‘लंबी है जिंदगी, मिलेंगे फिरसे…’, म्हणत सिद्धार्थ शुक्लाने घेतला सर्वांचा निरोप; व्हायरल होतोय व्हिडिओ

मूर्ती लहान पण कीर्ती महान! सोपी नव्हती वाट, वाचा के.के. गोस्वामी यांनी यशाचा शिखर गाठण्यासाठी केलेला संघर्ष

हे देखील वाचा