Tuesday, July 9, 2024

केबीसीच्या स्पर्धकाने अमिताभ यांच्या वेषभूषेवर कमेंट करत सुटच्या पॉकेटला म्हटले ‘बेकार’, पुढं काय झालं पाहाच…

अमिताभ बच्चन बॉलिवूडचे महानायक. अमिताभ यांनी नेहमीच त्यांच्या कामातून प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन केले आहे. अतिशय प्रभावी अभिनय, आकर्षक व्यक्तिमत्व, भारदस्त आवाज, लक्षवेधी अंदाज, उत्तम वक्तृत्व असणारे बच्चन साहेब नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकण्यात यशस्वी होतात. सध्या अमिताभ बच्चन त्यांच्या ‘कौन बनेगा करोडपती’ या शोमुळे सतत चर्चेत आहे. या शोमध्ये ते नेहमीच स्पर्धकांसोबत धमाल करताना दिसतात. सामान्यांना करोडपती बनवण्याचे अशक्य स्वप्न सत्यात उतरवण्यामध्ये सिंहाचाच वाट उचलणारे अमिताभ बच्चन या शो दरम्यान स्पर्धांच्या अनेक इच्छा पूर्ण करता, त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देताना दिसतात, त्यांचे सल्ले, माहिती सर्व ऐकताना दिसतात. त्यांच्या या अनोख्या अंदाजच सर्वांनाच खूप कौतुक वाटत असते.

या शोच्या प्रत्येक भागात नक्कीच असे काहीतरी घडते की, शोच्या बातम्या मीडियामध्ये यायला लागतात. सध्या सोशल मीडियावर या शो संबंधित एका व्हिडिओ खूपच व्हायरल होत आहे, ज्यात एका स्पर्धक अमिताभ यांच्या ‘सूट’बद्दल कमेंट करताना दिसत आहे. तसे पाहिले तर येणारे अनेक स्पर्धक अमिताभ यांच्या आकर्षक लूकची त्यांच्या कपड्यांची नेहमीच प्रशंसा करतात. अमिताभ यांना त्यांचे लूक खूपच चांगले दिसतात असेच सर्वांचे म्हणणे असते.

असे असूनही या पर्वातील एका स्पर्धकाने अमिताभ यांच्या कपड्यांबद्दल एका सल्ला दिला आहे. या खेळातील स्पर्धक असणाऱ्या प्रांशू यांनी अमिताभ बच्चन यांनी घातलेल्या सुटमधे असणाऱ्या पॉकेट स्क्वायरला बेकार म्हटले आहे. याचा एका व्हिडिओ चॅनेल त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये हॉट सीटवर बसलेल्या प्रांशू यांनी अमिताभ यांच्याशी गप्पा मारताना सांगितले, “सर तुम्हाला काहीतरी सांगायचे होते. ‘असा सूट (अमिताभ यांनी घातलेला सूट) माझ्याकडे देखील आहे. मात्र त्यात पॉकेट नाहीये. मला सुटमधे पॉकेट अजिबात आवडत नाही ते दिसताना खूप बेकार दिसते. हा सूट नेहमी लग्नांमध्येच घातला जातो.”

यावर अमिताभ हे जोरजोरात हसू लागले आणि म्हणाले, “जेव्हा हा खेळ संपेल तेव्हा मी माझा हा सूट काढून तुम्हाला देईन.” हे ऐकून प्रांशू खूप खुश झाल्याचे देखील दिसत आहे. शोचा नवीन प्रोमो पाहून आपल्याला हे तर नक्कीच समजत आहे की प्रांशू त्यांचा खेळ अतिशय उत्तम पद्धतीने खेळत आहे. या प्रोमोमध्ये अमिताभ त्यांना १ करोड रुपयांसाठी प्रश्न विचारताना दिसत आहे. आता प्रांशू या पर्वात करोडपती होण्याचा मान मिळवत या यादीत सामील होणार की नाही हे शो ऑन एयर झाले की समजेल.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-भारीच! कपाळी चंद्रकोर, नाकात नथ अन् केसात गजरा घालून स्मिता गोंदकर दिसतेय एकदम सुंदर

-‘पुरुषाचे शरीर’, म्हणणाऱ्या युजरला तापसी पन्नूचे खणखणीत प्रत्युत्तर; म्हणाली, ‘फक्त ही ओळ लक्षात ठेव…’

-लईच वाईट झालं! वयाच्या २५ व्या वर्षी मराठी अभिनेत्री ईश्वरी देशपांडेचा अपघातात मृत्यू

हे देखील वाचा