‘कौन बनेगा करोडपती’मध्ये भाग घ्यायचाय? पाहा कशाप्रकारे पोहचू शकता यावर्षीच्या हॉटसीटपर्यंत!

kaun banega crorepati 13 know everything from selection process to things required for participation


सोनी टीव्हीवरचा लोकप्रिय शो, ‘कौन बनेगा करोडपती’ पाहणे प्रेक्षकांना खूप आवडते. आता अमिताभ बच्चन ‘कौन बनेगा करोडपती १३’ घेऊन पुन्हा एकदा टीव्हीवर परत येत आहेत. या नवीन सीझनसाठी १० मे पासून नोंदणी प्रक्रिया सुरू होईल. १० मेपासून बिग बी सोनी चॅनलवर दररोज रात्री ९ वाजता एक प्रश्न विचारतील, ज्याचे उत्तर प्रेक्षकांना द्यावे लागेल.

‘कौन बनेगा करोडपती’ची निवड प्रक्रिया कोरोनाच्या आजारामुळे पूर्णपणे डिजिटल झाली आहे. यात भाग घेण्यासाठी ४ टप्प्यांमधून जाणे आवश्यक आहे. म्हणजेच ‘कौन बनेगा करोडपती १३’ मध्ये नोंदणी केल्यापासून ते निवडीपर्यंत एकूण ४ राऊंड आहेत आणि जो कोणी जे सर्व राऊंड पार करेल, तो हॉट सीटपर्यंत पोहोचेल.

हे आहेत ४ राऊंड
नोंदणी-
‘कौन बनेगा करोडपती १३’ची नोंदणी १० मे पासून, रात्री ९ वाजता सुरू होत आहे. रात्री ९ वाजताच सोनी चॅनलवर एक प्रश्न विचारला जाईल, ज्याचे उत्तर प्रेक्षकांना एसएमएसद्वारे किंवा सोनी लाइव्ह अॅपद्वारे द्यावे लागेल.

स्क्रिनिंग-
नोंदणी प्रक्रियेमध्ये योग्य उत्तर देणारे प्रेक्षक एका विशिष्ट प्रकारच्या निकषांच्या आधारावर, श्रेणीनुसार निवडले जातील आणि निवडलेल्यांना फोनवर काही प्रश्न विचारले जातील. त्यांच्याकडे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी फक्त १०-१५ सेकंद असतील. हे प्रश्न अमिताभ बच्चन यांच्या टेलिफोनिक आवाजात विचारले जातील.

ऑनलाईन ऑडिशन-
स्क्रिनिंगमध्ये निवडलेल्या प्रेक्षकांचे ऑनलाईन ऑडिशन घेतले जाईल. या ऑनलाइन ऑडिशनमध्ये सामान्य ज्ञान चाचणी असेल आणि त्यात एक व्हिडिओ देखील असेल, ज्याला निवडलेले लोक स्वतः शूट करतील आणि सोनी लाइव्ह अॅपवर अपलोड करतील. सोनी लाइव्ह अॅपवरही यासंदर्भातील माहिती दिली जाईल.

मुलाखत-
चौथा आणि शेवटचा राऊंड आहे मुलाखतीचा. ऑनलाइन ऑडिशनमध्ये ज्यांना शॉर्टलिस्ट केले गेले आहे, अशा सर्वांची मुलाखत घेण्यात येईल. त्यानंतर निवडलेल्या लोकांना ‘केबीसी १३’ च्या स्टेजवर बोलावण्यात येईल, जिथे ते ‘फास्टेस्ट फिंगर फर्स्ट’ राऊंड खेळतील. जो वेगवान आणि अचूक उत्तर देईल तो अमिताभ बच्चन यांच्याबरोबर हॉट सीटवर बसेल आणि त्याला करोडो जिंकण्याची संधीही मिळेल.


Leave A Reply

Your email address will not be published.