Tuesday, July 9, 2024

वडिलांप्रमाणे कवी का बनले नाहीत अमिताभ बच्चन? वाचा स्पर्धकाच्या प्रश्नावर काय म्हणाले ‘बिग बी’

बॉलिवूडचे शहेनशाह आणि बिग-बी म्हणून ओळखले जाणारे अमिताभ बच्चन यांनी आपल्या करिअरमध्ये खूप चांगली कामगिरी बजावली आहे. आता त्यांना कोणत्याही परिचयाची गरज नाही. बॉलिवूड इंडस्ट्रीचे यशस्वी आणि आदर्श अभिनेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्या ‘कौन बनेगा करोडपती’ या रियॅलिटी कार्यक्रमाची चर्चा नेहमीच असते. या कार्यक्रमात ते आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयी खूप सारे किस्से सांगताना दिसत असतात. तुमचे वडील खूप मोठे कवी होते, मग तुम्ही कवी का बनले नाही? असा एका चाहत्याने त्यांना यादरम्यान प्रश्न विचारला होता. चला तर जाणून घेऊया यावर अमिताभ यांनी काय उत्तर दिले…

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचे वडील हरिवंश राय बच्चन (Harivansh Rai Bachchan) हे दिग्गज कवी होते. त्यांची पत्नी तेजी बच्चन (Teji Bachchan) याही सामाजिक कार्यकर्त्या होऊन गेल्या आहेत. अमिताभ आपल्या वडिलांसारखेच होते, पण कवितांपेक्षा जास्त त्यांना अभिनय क्षेत्र आवडत होते. त्यांनी कवी बनण्याएवजी अभिनेता बनण्याला जास्त महत्व दिले. आज ते अभिनय क्षेत्रातील ‘महानायक’ बनले आहेत. त्यांच्या एका कार्यक्रमात त्यांना विचारले की, तुम्ही घरामध्ये कविता बनवत असता का?, अभिनेताने नाही असे म्हणत त्याचे कारणही सांगितले.

अमिताभ बच्चन ज्या कार्यक्रमात सूत्रसंचालन करत असतील तो कार्यक्रम तर हिट होणारंच, हे तर सगळ्यांनाच माहित आहे. सोबतच यातून अमिताभ यांच्याविषयी आणखी माहिती मिळवण्याची संधी देखील मिळते. गेल्या काही वर्षापासून अमिताभ बच्चन ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहेत. यावर्षी या या कार्यक्रमाचा 14वा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अमिताभ यांनी आपल्या आयुष्यातील काही रंजक किस्से या कार्यक्रमामध्ये प्रेक्षकांना सांगितले आहेत. यावेळी नुकत्याच झालेल्या भागामध्ये कानपूरचे अनिल माथूर हे हॉट सिटवर बसले होते. त्यांचे स्वागत करत खेळाला सुरुवात झाली. यासोबतच त्यांना विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना अमिताभ यांनी आणखी एक किस्सा सांगितला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

अमिताभ बच्चन कवी का बनले नाही?
जेव्हा अनिल माथूर यांनी अमिताभ यांना विचारले की, “तुम्ही तुमच्या वडिलांप्रमाणे घरी कविता बनवत असता का?” खेळाच्यामध्ये या प्रश्नाचे उत्तर देत असताना अमिताभ यांनी सांगितले की, “मी कविता नाही लिहित. माझ्या घरामध्ये माझे वडील कवी होते. मी मोठा होत असताना कामाला लागलो. त्यावेळी मला माझ्या आईने कवी बनू नकोस, घरामध्ये एकच कवी ठीक आहे, असे असे सांगितले होते.”

अमिताभ बच्चन यांचा ‘कौन बनेगा करोडपती’ या वर्षीच्या 14व्या भागाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. याव्यतिरिक्त त्यांच्या सिनेमांबद्दल बोलायचं झालं, तर ते ‘ब्रह्मास्त्र’ या सिनेमात झळकताना दिसणार आहेत. विशेष म्हणजे, त्यांच्या खात्यात ‘प्रोजेक्ट के’, ‘गुडबाय’, ‘द इंटर्न’ यांसारख्या अनेक सिनेमांचा समावेश आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
कार्तिक आर्यनचं धक्कादायक वक्तव्य; म्हणाला, ‘एका फ्लॉप सिनेमाने माझे करिअर संपेल…’
कपिल शर्मानंतर मेगा ब्लॉकबस्टर चित्रपटात दीपिकाची एंट्री, लूक पाहून चाहते फिदा
‘द काश्मीर फाईल्स’च्या दिग्दर्शकाने थेट सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावरच साधला निशाणा; म्हणाले…

हे देखील वाचा