Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

स्पर्धकापेक्षा त्याच्या गर्लफ्रेंडचीच जास्त चर्चा, बिग बी ही झाले आश्चर्यचकित

बॉलीवूड सुपरस्टार अभिताभ बच्चन यांच्या कौन बनेगा करोड़पति रिअ‍ॅलिटी शोच्या लेटेस्ट एपिसोडमध्ये खूप मजा आली.‘कौन बनेगा करोडपती १४’ चा नवा एपिसोड धमाकेदार आहे. या एपिसोडमध्ये २७ वर्षीय स्पर्धक आयुष गर्ग सहभागी झाला होता. मूळचा दिल्लीचा असलेला आयुष हा स्ट्रॅटेजी आणि ऑपरेशन मॅनेजर आहे आणि त्याने आपल्या उत्तरांनी होस्ट अमिताभ बच्चन यांच्यासह प्रेक्षकांचीही मनं जिंकली. नुकताच या एपिसोडचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आला आहे. ज्याची बरीच चर्चा होताना दिसत आहे. याचं कारण म्हणजे आयुष शोमध्ये त्याच्या गर्लफ्रेंडला घेऊन आला होता.

आयुषच्या या धाडसाचं बिग बींनी कौतुक केलं आहे. तसेच बिग बींनी त्यांच्या शालेय जीवनातील एक किस्साही सांगितला. त्यांच्यात आणि आयुषमध्ये अनेक साम्य असल्याचंही ते यावेळी म्हणाले. केबीसी खेळत असताना, आयुष गर्गनं सांगितलं की, त्याला खेळाची आवड आहे. तो फुटबॉल खेळतो मात्र त्याला क्रिकेटही बघायला आवडतं. आयुषच्या या बोलण्यावर बिग भी म्हणाले की, त्यांच्या आणि आयुष आयुष्यात अनेक साम्य आहेत आणि त्यांनाही हे दोन्ही खेळ खूप आवडतात.

जेव्हा तो हॉट सीटवर आला आणि आपल्या सोबत्याबद्दल बोलले तेव्हा अमिताभ बच्चन आश्चर्यचकित झाले. शोच्या सुरुवातीलाच अमिताभ बच्चन यांनी आयुषची गर्गशी ओळख करून दिली तेव्हा त्यांनी त्याला विचारले की, त्याच्यासोबत कोण आले आहे? ज्यावर आयुष हसतो आणि “माझी गर्लफ्रेंड आरुषी शर्मा.” असं उत्तर देतो. त्यानंतर कॅमेरा तिच्याकडे जातो ती हसून सर्वांना नमस्कार करताना दिसते. आयुषच्या या धाडसी निर्णयाबद्दल बिग बींनीही त्याचं कौतुक केलं.

अमिताभ यांना असे सांगून आश्चर्य व्यक्त केले की, बाकीचे स्पर्धक त्यांच्या आई, भावंडांना घेऊन येतात पण आयुषने त्याच्या गर्लफ्रेंडला आणले आणि अभिमानाने सांगितले की, ती त्याची गर्लफ्रेंड आरुषीला सोबत घेऊन आला आहे. जेव्हा अमिताभ बच्चन यांनी आयुषला विचारले की, तो त्याच्या गर्लफ्रेंडला कसा भेटला, आयुषने डेटिंग अ‍ॅपद्वारे सांगितले. हे ऐकून अमिताभ बच्चन यांनीही डेटिंग अ‍ॅपची माहिती घेतली.

 

View this post on Instagram

 

या शोशी संबंधित क्लिप्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. यासोबतच तुम्हाला सांगूया की आयुष खूप चांगला खेळ खेळतो. कौन बनेगा करोडपती १४ सोमवार-शुक्रवारी रात्री ९ वाजता प्रसारित होईल. स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने निर्मात्यांनी जॅकपॉटचे बक्षीस ७.५ कोटी रुपये केले आहे. तसेच, यावर्षी ७५ लाख रुपयांचा आणखी एक स्टॉप जोडला गेला आहे ज्यामुळे स्पर्धकांना मोठ्या प्रमाणात बक्षीस रक्कम जिंकण्यात मदत होईल.

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक वाचा-

‘रामायण’मध्ये ‘सीता’ साकारणाऱ्या अभिनेत्रीकडून मोठी चूक, स्वातंत्र्यदिनी करून बसली ‘हे’ कांड

काश्मिरी पंडिताच्या हत्येनंतर संतापले अनुपम खेर; म्हणाले, ‘गेल्या ३० वर्षांपासून…’

टिव्ही अभिनेत्रीच्या बोल्डनेसचा जलवा, फोटो पाहून नेटकऱ्यांना फुटला घाम

हे देखील वाचा