अभिनेत्रीने घेतलाय कधीही आई न होण्याचा निर्णय, पण का घेतलाय तिने हा निर्णय? वाचा संपूर्ण प्रकरण

अभिनेत्रीने घेतलाय कधीही आई न होण्याचा निर्णय, पण का घेतलाय तिने हा निर्णय? वाचा संपूर्ण प्रकरण


कविता कौशिक टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय नाव. कविताने सब टीव्हीवरील एफ.आय.आर या विनोदी मालिकेने प्रचंड लोकप्रियता मिळवली. या मालिकेने तिला संपूर्ण देशात घराघरात ओळख मिळवून दिली. चंद्रमुखी चौटाला हे नाव आज मालिका संपण्याच्या अनेक वर्षांनंतरही प्रेक्षकांच्या ओळखीचे आहे. याच चंद्रमुखीचा म्हणजेच कविता कौशिकचा १५ फेब्रुवारी १९८२ रोजी दिल्लीमध्ये जन्म झाला. कविताने २०१७ साली रोनित बिस्वास या तिच्या मित्रासोबत लग्न केले.

अनेक वर्ष या दोघांनी एकमेकांना डेट केले आणि २०१७ ला लग्न करण्याचा निर्णय घेतला. आज त्यांच्या लग्नाच्या चार वर्षानंतर अनेकांना त्यांच्या बाळाची प्रतीक्षा आहे. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये कविताने तिच्या आणि तिच्या नवऱ्याच्या बाळाच्या निर्णयांबद्दल सर्वाना सांगितले.

या मुलाखतीच्या वेळी ती म्हणाली, ” मी कधीही आई न होण्याचा निर्णय घेतला आहे. या एवढ्या मोठ्या निर्णयात रोनितही माझ्या सोबत आहे. त्याने देखील माझी बाजू समजून घेतली आहे. आम्ही दोघांनी संपूर्ण आणि नीट विचारपूर्वक हा निर्णय घेतला आहे. याचे कारण म्हणजे, मला माझ्या मुलावर कोणताही अन्याय करायचा नाही. मी जर आज वयाच्या ४० व्या वर्षी आई होणार असेल तर माझा मुलगा २० वर्षांचा होईपर्यंत मी आणि रोनित वृद्ध झालेले असू.’

‘माझ्या बाळाच्या केवळ २० व्या वर्षी मला त्याच्यावर म्हाताऱ्या आई-वडिलांची जबाबदारी लढायची नाहीये. आम्हाला हे जग शांत, सुंदर हवे आहे. आधीच गर्दीने गजबजलेल्या या जगात आम्हाला अजून भर घालून हे जग वाढवायची मुळीच इच्छा नाही. या गर्दीत भर घालत मुलाला मुंबईत धक्के खाण्यासाठी सोडून द्यावे, असे मला वाटत नाही.”

कविता पुढे म्हणते, “रोनित खूप लहान असताना त्याचे आई-वडिल वारले. मी एकुलती एक असल्याने मला देखील खूप कमी वयात कमला सुरुवात करून घराला आर्थिक मदत करावी लागली. सध्या मी आणि रोनित अगदी लहान मुलांसारखे आमचे आयुष्य मस्त एन्जॉय करतोय. कधी मी वडील एक म्हणून रोनितसोबत वागते, तो कधी तो माझी आई होतो. त्यामुळे आम्ही आमच्या आयुष्यातली बाळाची जागा भरून काढली आहे. आम्ही दोघांनी राजस्थानमधल्या एका लहान गावातील कुटुंबाला दत्तक घेतले आहे. त्याच्या सर्व गरज पूर्ण करण्याचा आम्ही दोघे नेहमी प्रयत्न करत असतो.”

कविता बिग बॉसच्या चालू पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती, मात्र ती काही दिवसांपूर्वीच या घरातून बाहेर पडली आहे. कविता सोशल मीडियावर खूप सक्रिय असून, ती नेहमी तिचे फोटो, व्हिडिओ पोस्ट करत असते. तिला योग करायला खूप आवडत असल्याने ती बऱ्याचदा योगाच्या हॉट पोज मधले फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.


Leave A Reply

Your email address will not be published.