Friday, December 27, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘काय डोंगर काय झाडी ओकेच हाय’ प्रसिद्ध डायलॉग लोकगीतकारांना घालतोय भुरळ!

पुणे(ता.२८) : सद्या महाराष्ट्रातील राजकीय स्थिती देशभरात चर्चेचा विषय आहे. शिवसेनेमध्ये दोन गट निर्माण झालेले चित्र पहायला मिळते आहे. ठाकरे विरुद्ध शिंदे असे या पक्षांतर्गत लढतीचे स्वरूप आहे. एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेल्या आमदारांपैकी सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांच्या कार्यकर्त्या सोबत झालेल्या संवादची ऑडिओ क्लिप महाराष्ट्रभर व्हायरल झाली आहे.आमदार पाटील कार्यकर्त्यासोबत बोलताना आसाम येथील गुवाहाटीचे वर्णन करताना ‘काय डोंगर..काय झाडी..काय हॉटेल एकदम ओक्के आहे’असे बोलत आहेत. हा त्यांचा संवाद ट्रेंडवर धुमाकूळ घालतो आहे.

काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक ऑडियो क्लिप व्हायरल होत होती. जी शिवसेनेचे सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांचा असल्याचा दावा केला जात होता. या क्लिपमध्ये शहाजी बापू गुवाहाटीमधील हॉटेलचे वर्णन करताना ‘काय डोंगर..काय झाडी..काय हॉटेल एकदम ओक्के आहे’ अशा अस्सल रांंगड्या भाषेत उल्लेख केला होता. त्यांची ही वाक्ये सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली होती. ज्यावर सोशल मीडियावर मिम्सचा महापूर आल्याचे पाहायला मिळाला होता. यावरील गाणेही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

याच धुमाकूळ घालणाऱ्या ट्रेंडवर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक साजन बेंद्रे यांनी आमदार यांच्या अस्सल गावरान संवादावर एक गाण आणलं आहे. साजन बेंद्रे हे महाराष्ट्रातील लोकगीतकारांपैकी ओळखीचे नाव आहे. ‘मला आमदार झाल्यासारखं वाटतंय’ या साजन यांनी लिहिलेल्या गाण्यानंतर हे ‘काय झाडी काय हाटेल’ हे शिवसेनेच्या बंडाखोर आमदारांवर हे गाण रचले आहे. यात ‘सत्तेला’ जानू अशी उपाधी दिली आहे. अल्पावधीतच हे गाणं ‘बोल मैं हालगी बजावू क्या ‘ सारखच हिट होऊन महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात पसरेल.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हे देखील वाचा