‘सूर्यवंशी’ या चित्रपटाचे सध्या जोरदार प्रमोशन चालू आहे. अशातच केबीसीच्या शानदार शुक्रवारमध्ये अक्षय कुमार आणि कॅटरिना कैफ खास पाहुणे म्हणून पोहचले होते. या मंचावर बरीच धमाल मस्ती पाहायला मिळाली. यावेळी रोहित शेट्टी आणि अक्षय कुमार यांनी शोचे होस्ट अमिताभ बच्चन यांना कॅटरिना कैफचा एक मजेदार व्हिडिओ दाखवला. हा व्हिडिओ पाहून बिग बी आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी कॅटरिना कैफला विचारले की, ती या व्हिडिओमध्ये काय करत आहे?
वास्तविक, या व्हिडिओमध्ये पांढरा लखनवी चिकन सूट परिधान केलेली कॅटरिना कैफ, ‘सूर्यवंशी’च्या सेटवर आनंदाने झाडू मारत होती. अक्षय कुमार हा व्हिडिओ शूट करत होता असे वाटते, कारण कॅमेराच्या मागून त्याचा आवाज ऐकू येत होता. (kbc 13 katrina kaif was found sweeping the sooryavanshi floor)
कॅटरिना कैफला ‘सूर्यवंशी’च्या सेटवर मोठ्या आनंदाने झाडू मारताना पाहून, अमिताभ बच्चन देखील आश्चर्यचकित झाले. या व्हिडिओमध्ये अक्षय कॅटरिनाला विचारतो की, “कॅटरिना जी तुम्ही काय करत आहात?” त्याला प्रत्युत्तर देत ती म्हणाली, “साफ सफाई.”
यानंतर अक्षय कुमारने अमिताभ बच्चन यांना सांगितले की, ‘कॅटरिना कैफ खरंच सूर्यवंशीच्या सेटवर साफसफाई करत होती. यामागचे कारण म्हणजे, तिला ‘स्वच्छ भारत’ मोहिमेची ब्रँड ऍम्बेसेडर व्हायचे आहे.” हे ऐकून तिथे उपस्थित प्रेक्षकांमध्ये एकच हशा पिकला.
अक्षय कुमार आणि कॅटरिना कैफ यांचा ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट कोरोना महामारीमुळे मागील अनेक महिन्यांपासून प्रदर्शित केला नव्हता. परंतु या दिवाळीच्या मुहूर्तावर रोहित शेट्टीने प्रेक्षकांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम दिला आहे. ‘सूर्यवंशी’ चित्रपट शुक्रवारी (५ नोव्हेंबर) जवळपास ४००० स्क्रीनवर प्रदर्शित झाला आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-सिल्व्हर रंगाच्या शिमरी गाऊनमधे करिश्मा कपूरचा घायाळ करणारा अंदाज पाहिला का?
-करीनाचा चिमुकला जेह दिसला आत्या सबाच्या मांडीवर खेळताना; पाहा ‘हा’ गोंडस फोटो