Wednesday, June 26, 2024

‘केबीसी १३’मध्ये स्पर्धकाने केले ‘असे’ काही; अमिताभ बच्चन म्हणाले, ‘स्वप्नातही विचार केला नव्हता…’

हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘महानायक’ अमिताभ बच्चन यांना आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. त्यांची ख्याती जगभर पोहोचली आहे. त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीला एकापेक्षा एक चित्रपट दिले आहेत. अमिताभ हे छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध रियॅलिटी शो ‘कौन बनेगा करोडपती’ अनेक वर्षांपासून होस्ट करत आहेत. सध्या ते या शोचे १३ वे पर्वही होस्ट करताना दिसत आहेत. या शोमध्ये येणार अनेक स्पर्धक अमिताभ यांची आणि त्यांच्या चित्रपटांची प्रशंसा करताना दिसतात. अनेक राऊंड पार करून हॉट सीटवर बसल्यापासूनच अनेक स्पर्धक स्वत:ला करोडपती समजू लागतात. मात्र, असे अनेक स्पर्धक असतात, ज्यांच्यावर अमिताभ यांच्या स्टारडमचा कोणताही परिणाम दिसत नाही. असेच काहीसे शोमधील नव्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

‘कौन बनेगा करोडपती १३’ या शोमधील प्रोमोमध्ये एक स्पर्धक अमिताभ यांच्यासोबत खेळ खेळताना दिसत आहे. या खेळाचे नाव ‘लाल मिरची आणि हिरवी मिरची’ आहे. हा खेळ अमिताभ नाही, तर स्पर्धक खेळत आहे. स्पर्धक अगदी आरामात अमिताभ यांच्यासोबत एक घरगुती खेळ खेळत आहे. तिला असे करताना कोणत्याही प्रकारची समस्या नाहीये. अमिताभही ‘लाल मिरची आणि हिरवी मिरची’ हा खेळ मजेत खेळताना दिसत आहेत. इतकेच नाही, तर स्पर्धक त्यांना पटापट करण्याचा आदेशही देताना दिसत आहे. (KBC 13 Superstar Amitabh Bachchan Plays Funny Game With Contestant Video Viral)

यादरम्यान अमिताभ मजेत म्हणतात की, त्यांनी स्वप्नातही विचार केला नव्हता की, कधी ‘लाल मिरची आणि हिरवी मिरची’ हा खेळ खेळावा लागेल. शोवर पोहोचलेल्या या स्पर्धकाचे नाव रुची आहे. तिने शोवर अमिताभ यांच्यासोबत खेळ खेळण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर अमिताभ म्हणतात की, “मी तुमच्यासोबत खेळतोय, याने तुम्ही समाधानी नाहीत का?” यावर स्पर्धक त्यांना मनवत म्हणते की, “सर इथे मी तुमच्याशी खेळतेय, आता तुम्ही माझ्याशी खेळ खेळा.”

अमिताभ स्पर्धकासोबत एका प्लेटमध्ये हिरवी मिर्ची आणि लाल मिरचीसोबत मजेशीर अंदाजात गेम खेळत आहेत. तसेच स्पर्धक त्यांना खेळाचे नियम समजून सांगते, तेव्हा अमिताभ मध्येच सांगतात की, “अरे लक्षात तरी ठेवू द्या.”

‘कौन बनेगा करोडपती १३’ या शोमध्ये अमिताभ बच्चन खेळत आहेत आणि स्पर्धक गात आहे, ‘लाल मिरची, हिरवी मिरची, मिरची खूप जोरात, भाऊजी सांभाळून राहा, ताई खूपच वेगात.’ याव्यतिरिक्त मध्ये मध्ये अमिताभ यांना वेगात खेळण्यासही सांगते. कारण, वेळ जात आहे.

विशेष म्हणजे, अशाप्रकारचा खेळ हा नेहमी लग्नाच्या खास क्षणी खेळला जातो.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अखेर मुनमुन दत्ताने शेअर केला तिच्या जोडीदाराचाच व्हिडिओ

-‘क्वीन’ म्हणत सलमान खानने उडवली खिल्ली; संतापलेल्या शमिताचे प्रत्युत्तर, भाईजाननेही घेतली शाळा

-शाहिदने लपून काढला मीराचा कपडे घालतानाचा व्हिडिओ, बघण्यासारखी होती पत्नीची रिऍक्शन

हे देखील वाचा