सोनी टीव्हीचा शो ‘कौन बनेगा करोडपती’च्या १३ व्या सीझनमध्ये हिमानी बुंदेला ही पहिली करोडपती बनली आहे. अमिताभ बच्चन यांच्या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन विजेती ठरलेली हिमानी ही अंध आहे. उत्तर प्रदेशातील आगरा येथील रहिवासी हिमानीने या शोदरम्यान सांगितले की, गायक जुबिन नौटियाल हा तिचा आवडता गायक आहेत. शो दरम्यान अमिताभ यांनी हिमानीला जुबिनसोबत बोलण्याची संधी ही दिली. त्याचवेळी तिने जुबिनला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती.
केबीसी दरम्यान, शोचे होस्ट अमिताभ बच्चन यांनी जुबिन नौटियालचा आवाज हिमानी बुंदेलाला ऐकवला होता. जुबिनचा आवाज ऐकून हिमानीला अगोदर विश्वास बसला नाही. नंतर तिने आणखी काही तर बोलायला सांगितले. मग जुबिनने एक गाणं गायलं. ते ऐकल्यानंतर हिमानीचा आनंद गगनात मावेनासा झाला. यावर अमिताभ म्हणाले की, “आता तुम्ही नाव सांगा.” त्यावर ती म्हणाली की, “अहो सर माझे आवडते जुबिन नौटियाल.” तेव्हा हिमानी २५ लाखांपर्यंत पोहोचली होती. त्याचवेळी हिमानीने जुबिनला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. शोनंतर हिमानीने जुबिनला व्हॉईस मेसेज पाठवला होता. (Singer Zubin Natial gave a huge surprise to this contestant of ‘Kaun Banega Crorepati’)
गायक जुबिन नौटियालनेही आपल्या या निरागस आणि बुद्धिमान चाहतीला आश्चर्यचकित करण्याचा निर्णय घेतला. हिमानीची बहीण आणि जुबिनच्या टीमने मदत केली आणि सर्व व्यवस्था केली गेली. माध्यमांशी बोलताना जुबिनने सांगितले की, “जेव्हा मला हिमानीचा व्हॉईस मेसेज आला, तेव्हा मी इतका प्रभावित झालो की मी भेटायचे ठरवले. जेव्हा मी हिमानीला भेटलो, तेव्हा मला खूप प्रेम मिळाले. त्यांचे कुटुंबही खूप आनंदी होते. हिमानीसारख्या चाहत्याला भेटून मला स्वतःला किती आनंद झाला हे मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. हे आपल्या देशाचे भविष्य आहेत. त्याच्या बुद्धिमत्तेने मी प्रभावित झालो.”
प्रसिद्ध गायक जुबिन नौटियाल हिमानी बुंदेलाच्या घरी पत्रकार म्हणून भेटायला गेला होता. जुबिन तिच्या घरी पोहोचला आणि हिमानीच्या शेजारी बसून ‘खुशी जब भी तेरी’ गाऊन तिला सरप्राईज केले.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-कैसे भुलू तुझे! सिद्धार्थच्या निधनाने अजून ही धक्क्यात आहे आसीम; सतत पाहतोय दोघांचे व्हिडिओ
-सायरा बानूंची आयसीयूमधून झाली मुक्तता; डिप्रेशन अन् ऍंजिओग्राफीबद्दल खुलासा करत डॉक्टर म्हणाले…