बॉलिवूडमध्ये ट्रोलिंगपासून आणि टीकेपासून कोणीच वाचू शकत नाही. माणूस म्हटलं की, त्याच्याकडून चूक होणारंच. परंतु कलाकारांनी काही चूक केली, तर त्यांना ट्रोलिंगचा तसेच प्रकरण जास्त चिघळल्यास बॉयकॉटचाही सामना करावा लागतो. याचा अनुभव चक्क बिग बींनी देखील घेतला आहे.
लहानांपासून मोठ्यांपर्यंत आणि विशेष म्हणजे अभ्यासू बुद्धी असलेले प्रेक्षग ‘कौन बनेगा करोडपती’ हा कार्यक्रम आवडीने पाहतात. या कार्यक्रमातील प्रश्न आणि बिग बीं बरोबरचा एक अनुभव मिळत असल्याने सामान्य नागरिकांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत अनेकांनी या कार्यक्रमाला चांगलीच पसंती दाखवली आहे. सध्या अमिताभ बच्चन सूत्रसंचालित ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाचे १३वे पर्व सुरू झाले आहे. या पर्वामध्ये देखील चाहत्यांची संख्या मोठी आहे. रसिक प्रेक्षकांचा या कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. परंतु २०१९ मध्ये हाच कार्यक्रम बॉयकॉट होता होता राहिला.
साल २०१९ मध्ये ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाचे ११वे पर्व सुरू होते. त्यावेळी बॉयकॉट ‘कौन बनेगा करोडपती’ हा ट्रेंड सुरू होता. झालं असं की, या कार्यक्रमामध्ये बिग बी स्पर्धकाला प्रश्न विचारत होते. त्यावेळी पर्यायांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव एकेरी उल्लेखात दिले होते. पर्यायांमध्ये कॉम्प्युटर स्क्रीनवर शिवाजी महाराजांचे नाव ‘शिवाजी’ एवढेच लिहिले होते, आणि अमिताभ बच्चन यांनी देखील हे नाव एकेरी उल्लेखांमध्येच वाचले. त्यांनतर सर्वत्र ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमावर टीका होऊ लागली.
विशेषश म्हणजे या प्रश्नाच्या पर्यायांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचेच नाव ‘शिवाजी,’ असे एकेरी लिहिले होते इतर पर्यायांमध्ये ‘महाराणा प्रताप’, ‘राणा सिंग’ आणि ‘महाराजा रणजीत सिंग’ अशी नावे लिहिली गेली. त्यामुळे मराठ्यांच्या भावना व शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन पुढे चाललेल्या प्रत्येक व्यक्तीच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या. यावर बिग बींनी माफी मागितली. तसेच सिद्धार्थ बासू आणि सोनी टीव्हीने देखील ट्वीट करत माफी मागितली.
या कार्यक्रमाच्या क्रिएटिव्ह प्रोड्युसरपैकी एक सिद्धार्थ बासू ट्वीट करत म्हणाले की, “केबीसी ११ मध्ये विचारल्या गेलेल्या प्रश्नांमधून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा आमचा हेतू नव्हता. या पर्वामध्ये असे अनेक प्रश्न आले आहेत, ज्यामध्ये त्यांचे नाव पूर्ण वापरले गेले आहे. फक्त याच प्रश्नाच्या पर्यायांमध्ये आमच्याकडून नकळत ही चूक झाली. त्यासाठी आम्ही क्षमस्व आहोत.”
No insult or disrespect whatsoever was intended to the memory of Chhatrapati Shivaji Maharaj in a question on KBC 11. This season there have been a number of questions which have all used his name with the full title. Apologies for the inadvertent omission of title in the choice pic.twitter.com/4iFYeLyfVd
— Siddhartha Basu (@babubasu) November 8, 2019
त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी देखील सिद्धार्थ बासू यांच्या ट्विटला रिट्विट करत माफी मागितली. बिग बी म्हणाले की, “कुणाचाही अनादर करण्याचा हेतू अजिबात नाही… तरी कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर मी दिलगिरी व्यक्त करतो.” असे बोलत बिग बींनी हात जोडलेले ईमोजी देखील टाकले होते.
No disrespect meant at all .. apologies if it has hurt sentiments .. ???? https://t.co/ynPav4DYfO
— Amitabh Bachchan (@SrBachchan) November 8, 2019
या सर्व प्रकारानंतर हा कार्यक्रम चालणार की, नाही अशी अनेकांना शंका वाटत होती. परंतु तसे काही झाले नाही आणि केबीसीच्या १३व्या पर्वाला देखील चाहत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘पद्मावत’ फेम सरभ आहे मानसशास्त्राचा पदवीधर; रणवीरला त्याची ‘ही’ गोष्ट आवडल्याने मिळाला चित्रपट
-‘पोन्नियन सेलवन’ सिनेमातील ऐश्वर्याचा फोटो लीक; अभिनेत्री दिसली ‘या’ अवतारात