Friday, November 22, 2024
Home बॉलीवूड कर्जात बुडालेल्या अमिताभ बच्चन यांचे तारणहार ठरले ‘यश चोप्रा’ आणि ‘केबीसी’

कर्जात बुडालेल्या अमिताभ बच्चन यांचे तारणहार ठरले ‘यश चोप्रा’ आणि ‘केबीसी’

हिंदी सिनेसृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन यांना ओळख नसलेला एकही व्यक्ती या जगात शोधूनही सापडणार नाही. फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्यांनी खूप मोठा आणि चढ उतारांनी भरलेला लांब प्रवास केला आहे. नुकताच ११ ऑक्टोबरला अमिताभ यांनी त्यांचा ७९ वा वाढदिवस साजरा केला. या वयातही ते त्याच जोशाने आणि उत्साहाने काम करताना दिसतात. अमिताभ यांनी १९६९ साली प्रदर्शित झालेल्या ‘सात हिंदुस्थानी’ सिनेमात काम करत बॉलिवूडमध्ये पहिले पाऊल टाकले. त्यानंतर त्यांनी असंख्य चित्रपटांमध्ये दंडार भूमिका साकारल्या. यात ‘शोले’, ‘अमर अकबर अँथनी’, ‘आनंद’, ‘जंजीर’, ‘अभिमान’, ‘दीवार’, ‘मुकद्दर का सिकंदर’, ‘शक्ती’, डॉन, ‘मोहब्बते’, कभी ख़ुशी कभी गम’ आदी अनेक हिट चित्रपटांचा या आयडीत समावेश आहे. मुख्य भूमिकांसोबतच त्यांनी चरित्र भूमिका देखील प्रभावीपणे साकारल्या. त्यांना बॉलिवूडचा ‘शेहंशाह’ असे उगाचच नाही म्हटले जात.

अमिताभ यांनी बॉलीवूडमध्ये दमदार काम करत प्रेक्षकांवर आपली छाप सोडली. त्यांनी त्यांच्या मेहनतीने नेम, फेम, मनी आदी सर्व कमावले. आज अमिताभ हजारो कोटी रुपयांच्या संपत्तीचे मालक आहे. त्यांच्या नावावर अनेक कोटी रुपये निर्माते लावतात. पण म्हणतात ना, ‘पाचही बोटं सारखी नसतात’, अगदी तसेच झाले. चांगले दिवस येत असताना नशिबाचा फेरा बदलला आणि वाईट दिवसांनी देखील त्यांच्या आयुष्यात एन्ट्री मारली आणि हा हा म्हणता श्रीमंत असलेल्या अमिताभ यांनी स्वतःला कंगाल घोषित केले. एवढेच नाही तर कर्जदार अमिताभ बच्चन यांच्या दारात पोहचले होते.

अमिताभ बच्चन हे ९० च्या दशकात त्यांच्या करिअरमध्ये यशाच्या शिखरावर होते. अमिताभ बच्चन यांनी ABCL नावाने त्यांचे प्रोडक्शन हाऊस सुरु केले. या प्रॉडक्शन हाऊसमुळे अमिताभ यांना नफा होण्यापेक्षा मोठे नुकसानच सोसावे लागले. आश्चर्याची गोष्ट ही आहे की, या प्रॉडक्शन हाऊसमुळे बिग बी यांनी स्वतः ला कंगाल घोषित केले. या प्रोडक्शन हाऊसमध्ये तयार झालेले सर्व सिनेमे फ्लॉप गेले आणि अमिताभ पूर्णपणे कर्जात बुडाले. अशा कठीण काळात अमिताभ बच्चन यांची साथ यश चोप्रा यांनी दिली होती.

अमिताभ बच्चन यांनी यश चोप्रा ह्यांच्यासोबत बरेच चित्रपट केले. यश चोप्रा यांच्या चित्रपटांनी अमितजींच्या करिअरला एक नवी चकाकी दिली. पण ‘सिलसिला’ चित्रपटानंतर दोघांनी बराच काळ एकत्र काम केले नव्हते. मात्र ९०च्या दशकात अमिताभ बच्चन कर्जबाजारी झाल्यावर त्यांना पुन्हा यश चोप्राची आठवण झाली, आणि ते यश चोप्रा यांच्याकडे काम मागायला गेले.

एक मुलाखतीत अमिताभ बच्चन यांनी सांगितले की, “त्या दिवसात मी असा विचार करायचो की, आता पुढे काय? मी विचार केला होता की, मी एक अभिनेता आहे आणि म्हणूनच मी अभिनय करण्याचे ठरवले. मग मी यश चोप्रा यांच्याकडे गेलो आणि त्यांना म्हणालो की मला काम द्या. माझ्याकडे काही काम नाही आणि मला आता कामाची खूप गरज आहे. त्यांनी मला ‘मोहब्बते’ सिनेमात भूमिका दिली आणि माझी गाडी रुळावर आली.

दरम्यान, अमिताभ बच्चन यांना हॉलिवूडचा सुपरहिट शो ‘हू वॉन्टस टू बी मिलियनेअर’ या शोचे हिंदी व्हर्जन असलेल्या ‘कौन बनेगा करोडपती’ शोचे सूत्रसंचालन करण्याची ऑफर मिळाली. या ऑफेरला होकार द्यायला त्यांनी अजिबात वेळ वाया घालवला नाही. आज एवढ्या वर्षांनी ‘केबीसी’ म्हटले की, अमिताभ बच्चनच सर्वांना आठवतात. इतके बिग बी या शोसोबत मिसळून गेले आहे. या शोने अमिताभ यांना एक नवीन ओळख तर दिली शिवाय त्यांच्या लोकप्रियतेत अधिक भर देखील घातली. हा शी सुरु झाल्यापासूनच या रियॅलिटी शोचे रेटिंग नेहमीच चांगले येते. या शोने टीव्ही माध्यमातून अमिताभ यांची एक वेगळी ओळख निर्माण केली. एका रिपोर्टनुसार हा शो होस्ट करण्यासाठी बिग बी प्रत्येक भागाची १५ कोटी रुपये घेतात.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

नादच खुळा! अमिताभ बच्चन यांच्यासोबत सावलीप्रमाणे राहणाऱ्या बॉडीगार्डला मिळतो ‘इतका’ पगार; आकडा तर वाचा…

अमिताभ नव्हे, तर ‘या’ नावाने आई मारायची हाक; रेखा यांना सोडण्यामागे होते ‘हे’ मोठ्ठे कारण

सलमान खानने बहीण अर्पिताला लग्नात दिलं होतं ‘हे’ महागडं गिफ्ट, किंमत ऐकून तर फिरतील तुमचे डोळे

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा