Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

“आर्थिक विवंचना असल्यावर हातात पैसे” केदार शिंदे यांनी ‘या’ विनोदी अभिनेत्यासाठी लिहिले खास पोस्ट

मराठी मनोरंजनविश्वामधे अनेक असे कलाकार आहेत ज्यांच्यात भरभरून प्रतिभा आहेत. विनोदाच्या विभागात तर एका पेक्षा एक असे प्रतिभावान कलाकार येत आहेत, तर कहाणीची प्रतिभा लोकांपर्यंत पोहचण्यास जरा काळ लागतो. मात्र म्हणतात ना तुमच्या खरी प्रतिभा असेल तर तुम्ही यशस्वी होतात आणि लोकांपर्यंत पोहचतातच असेच काहीसे अनेक कलाकारांच्या बाबतीत झाले आहे. यातलेच एक अभिनेते म्हणजे अरुण कदम. अरुण कदम यांनी अनेक हिंदी मराठी चित्रपट मालिकांमध्ये लहान मोठ्या भूमिका केल्या, मात्र त्यांना मोठी ओळख आणि प्रसिद्धी दिली ती ‘महाराष्ट्र्राची हास्यजत्रा’ या शो ने. आता संपूर्ण महाराष्ट्राला अरुण कदम हे नाव परिचयाचे झाले आहे. मात्र मागील अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीमध्ये असल्यामुळे त्यांचा मोठा मित्र परिवार या क्षेत्रात आहे. असाच त्यांचा एक मित्र म्हणजे दिग्दर्शक केदार शिंदे.

आज मराठी मनोरंजनविश्वामधे ‘महाराष्ट्र्र शाहीर’ या सिनेमाची चांगलीच हवा आहे. केदार शिंदे यांचे दिग्दर्शन असलेल्या या सिनेमाने चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे. सिनेमाचे प्रमोशन देखील दणक्यात सुरु आहे. यासाठीच नुकतीच शाहिरची टीम हास्यजत्रेमधे पोहचली होती. तेव्हा जुने मित्र असलेल्या केदार आणि अरुण यायची भेट झाली आणि त्यानंतर केदार शिंदे यांनी एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kedar Shinde (@kedarshindems)

केदार शिंदे यांनी या पोस्टमध्ये लिहिले, “बरेच दिवस झाले या आमच्या मित्राविषयी, म्हणजे सर्वांचा लाडका दादुस अरुणविषयी, लिहायचं होतं. पण जमलंच नाही. ‘महाराष्ट्र शाहीर’च्या प्रमोशनसाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये गेलो होतो. त्या वेळचा हा खास फोटो. अरुण आणि माझी मैत्री १९९० पासून. माझ्या अनंत सुखदुःखांत तो महत्त्वपूर्ण भूमिकेत होता. आमच्या सगळ्यांमध्ये लवकर सेटल होणारा, घसघशीत कमाई करणारा पहिला अरुणच. आर्थिक विवंचना असल्यावर हातात पैसे ठेवणारा अरुणच. कित्येक दिवस मी त्याच्या बीएमसी ॲाफिसात काढले आहेत. त्याच्या जीवावर पोट भरलं आहे. आमच्यात वयाने खूप मोठा, पण त्याची मस्करी करताना ते कधीच डोक्यात येत नाही. गण-गवळण, बतावणी आम्ही दोघं ‘लोकधारा’मध्ये सादर करायचो. त्याच्या डोळ्यात दिसायचं की, पुढचं वाक्य तो विसरला आहे. पण आविर्भाव असा असायचा की, समोरचा वाक्य विसरला आहे. आता आम्ही एकत्र फार काम करत नाही. पण त्याची प्रगती पाहून अभिमान वाटतो. आत्ताच्या पिढीतील मुलांसोबत तो त्याच ऊर्जेने काम करतो हे पाहून मन भरून येतं. खूप शुभेच्छा अरुण.” केदार शिंदे यांनी अरुण कदम यांच्याबरोबर काढलेला एक फोटो देखील सोबत पोस्ट केला आहे.

दरम्यान केदार शिंदे यांची ही पोस्ट खूपच व्हायरल झाली असून, अनेकांनी त्यांचे आणि अरुण कदम यांची मैत्रीचे कौतुक केले आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

बॉलिवूडपासून लांब आत्मिक शांतीसाठी आमिर खानने गाठले नेपाळ, विपश्यना केंद्रात करणार मेडिटेशन

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी गुपचूप उरकला साखरपुडा? डायमंड रिंग फ्लॉन्ट करताना परी झाली स्पॉट

हे देखील वाचा