Wednesday, June 25, 2025
Home बॉलीवूड रितेश आणि जिनिलिया यांचा एयरपोर्टवरील ‘तो’ व्हिडिओ झाला व्हायरल, दोघांची नम्रता पाहून नेटकरी देखील झाले खुश

रितेश आणि जिनिलिया यांचा एयरपोर्टवरील ‘तो’ व्हिडिओ झाला व्हायरल, दोघांची नम्रता पाहून नेटकरी देखील झाले खुश

मनोरंजनविश्वात असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी त्यांची प्रसिद्धी, नाव, पैसा या पलीकडे जात माणुसकी आणि नम्रता दाखवली आहे. कलाकार म्हटले की, फॅन्स तर आलेच जो कलाकार त्याच्या फॅन्सला योग्य पद्धतीने वागवतो त्याचे नेहमीच कौतुक होते. चाहते आहेत तर कलाकार हे कलाकार आहेत. त्यामुळे प्रेक्षक आणि फॅन्समुळे आपण सेलिब्रिटी आहोत हे जे कलाकार विसरत नाही, ते नेहमीच यशस्वी होतात आणि त्यांना नेहमीच लोकांचे प्रेम मिळते. सिनेसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी फॅन्सला कधीही दुखावले नाही. त्यांना कितीही त्रास, टेन्शन असले तरी फॅन्ससाठी त्यांच्या चेहऱ्यावर सतत हास्य असते. आता असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका अभिनेत्याच्या नम्रपणामुळे लोकांची मने जिंकून घेतली आहे.

अभिनेता रितेश देशमुख आणि पत्नी जिनिलीया देशमुख या जोडीला फक्त बॉलिवूडचं नाही तर मराठी इंडस्ट्रीमधील लोकप्रिय कपल म्हणून ओळखले जाते. त्यांना अमाप फॅन्स आहेत. या जोडीचे आणि त्यांच्या मुलांचे नेहमीच विविध व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. काही महिन्यांपूर्वी या जोडीचा ब्लॉकबस्टर ठरलेला ‘वेड’ सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमाने आणि यातील गाण्यांनी अक्षरशः लोकांना वेडच लावले होते. आजही त्याची जादू लोकांवर पाहायला मिळते. सध्या सोशल मीडियावर रितेशचा एक व्हिडिओ कमालीचा व्हायरल होत आहे, ज्यात तो वेड लागले गाण्यावर एका मुलासोबत डान्स करतोय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

नुकताच रितेश जिनिलियासोबत एयरपोर्टवर स्पॉट झाला. यावेळी तो चालत असताना एक मुलगा रितेशला मधेच थांबवतो आणि त्याच्यासोबत ‘वेड लागलंय’ या गाण्यावर डान्स करण्याची इच्छा व्यक्त करतो. रितेशही त्याची मागणी मान्य करतो. पुढे तो छोटा मुलगा मोबाईल घेऊन ते गाणे लावतो. गाणे लावत असताना रितेश कोणतीही तक्रार न करता त्याच्या बाजूला उभा या व्हिडीओमध्ये दिसतो तर जिनिलीया देखील त्यांच्यापासून थोडे लांब उभी असल्याचे दिसते. मुलाने ‘वेड लावलंय’ हे गाणं लावल्यानंतर रितेश आणि तो त्या गाण्यावर डान्स करतात आणि तिथून निघून जातात.

या संपूर्ण व्हिडिओमध्ये कुठे रितेश किंवा जिनिलिया यांच्या चेहऱ्यावर वैतागलेले, कंटाळलेले भाव दिसले नाही जिनिलिया देखील त्या दोघांना डान्स करू देते. या दोघांच्या या नम्रतेमुळे त्यांचे कमालीचे कौतुक होत असून, व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
ऐकावे ते नवलच! वयाच्या ७९ व्या वर्षी ‘हा’ अभिनेता सातव्यांदा झाला बाबा, स्वतःच केला खुलासा

आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवणाऱ्या ‘या’ गायिकेचे वयाच्या ७५ व्या वर्षी दुःखद निधन

हे देखील वाचा