Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

अवैध पद्धतीने घरात हस्तिदंत ठेवल्याप्रकणी दाक्षिणात्य अभिनेते मोहनलाल यांना कोर्टाचा मोठा झटका

दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये कार्यरत असणारे दिग्गज आणि प्रतिभावान अभिनेते मोहनलाल यांच्याकडे अवैध पद्धतीने घरात ठेवलेले हस्तिदंत आढळले होते. त्यामुळे त्यांच्यावर या विरोधात कोर्टात खटला सुरु आहे. आता केरळ कोर्टाने मोहनलाल यांच्या या खटल्यावर एक मोठा आणि त्यांना धक्का बसेल असा निर्णय दिला आहे. केरळ उच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या मोहनलाल यांच्या विरोधात खालच्या कोर्टाचा खटला परत घेण्याचा आदेश रद्द केला आहे. करेल कोर्टाने राज्याची याचिका आंशिक पद्धतीने स्वीकारली आणि मॅजिस्ट्रेट कोर्टाकडून थोडीफार मुभा मिळण्यासाठी पुन्हा एकदा विचार करायला सांगितला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mohanlal (@mohanlal)

दरम्यान खालच्या कोर्टाच्या आदेशाला देखील केरळ कोर्टाने फेटाळत लावले असून, केस परत घेण्याच्या याचिकेवर पुन्हा नव्याने विचार करण्याचा आदेश दिला आहे. उच्च न्यायालयाने सांगितले की, “राज्य सरकारने सध्याच्या खटल्यातील याचिका मागे घेण्याच्या मागणीवर, ट्रायल कोर्टाने पुनर्विचार करणे आवश्यक आहे. यासोबतच पक्षकारांना ३ मार्च रोजी कनिष्ठ न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.”

पुढे उच्च न्यायालयाने सांगितले की, “या आदेशाची प्रत मिळाल्यानंतर कमीत कमी सहा महिन्यांच्या आत किंवा जितक्या लवकर शक्य आहे तितक्या लवकर नवीन आदेशाला ऐकून तो पारित करण्याचा कालावधी ट्रायल कोर्टाला दिला जात आहे.” तत्पूर्वी जून २०१२ साली आयकर अधिकाऱ्यांनी अभिनेते मोहनलाल यांच्या घरी मारलेल्या छाप्यामध्ये चार हत्तीचे दात अवैध पद्धतीने घरात ठेवल्याचे आढळून आले होते. त्यानंतर मोहनलाल यांच्यावर कारवाई करत तक्रार दाखल केली गेली. तक्रार नोंदवणाऱ्या व्यक्तीने मोहनलाल यांच्यावर आरोप लावत म्हटले की, मोहनलाल यांनी कोणत्याही पद्धतीच्या चौकशीशिवाय त्यांच्या अभिनेता या पदाचा वापर करत या प्रकरणाला दाबण्याचा प्रयत्न केला होता.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मल्याळम अभिनेत्री सुबी सुरेश यांचे वयाच्या ४१ व्या वर्षी दुःखद निधन

साऊथ इंडस्ट्रीमधील ‘हे’ दिग्गज अभिनेते किडनी स्टोनवरील उपचारासाठी रुग्णालयात दाखल

हे देखील वाचा