‘बोनी एम’ या वोकल ग्रूपचे ‘रासपुतीन’ हे गाणे यूट्यूबवर धमाल करत आहे. हे गाणे सर्वत्र मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे. या गाण्याचे संगीत ऐकून कोणीही स्वतःला डान्स करण्यापासून थांबवू शकत नाही. या गाण्यावरील अनेक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहेत. अशातच नुकताच केरळमधील दोन वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचा या गाण्यावरील व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
नवीन के रजक आणि जानकी ओमकुमार ही या विद्यार्थ्यांची नावे आहेत. त्यांनी या व्हिडिओमध्ये जबरदस्त डान्स केला आहे. त्यांचा हा डान्स बघून सोशल मीडिया वरील सगळेच युजर्स खूप प्रभावित होताना दिसत आहेत. या गाण्यातील त्यांच्या डान्स स्टेप्सपासून ते त्यांच्या एनर्जीपर्यंत सगळेजण त्या दोघांचे कौतुक करत आहेत.
या डान्स व्हिडिओला केरळच्या नवीन के रजक या विद्यार्थ्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 2 लाखांपेक्षाही जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडिओ शेअर करत नवीन रजक याने लिहिले आहे की, “संधी मिळेल तिथे डान्स करा आणि जानकी ओमकुमार तू तुझा बहुमूल्य वेळ दिलास त्याबद्दल धन्यवाद.”
नवीन के रजक याने हा व्हिडिओ शेअर करत सांगितले आहे की, त्याला वानसेका यांच्या कोरिओग्राफीमधून डान्ससाठी प्रेरणा मिळाली आहे. नवीन रजक आणि जानकी राजकुमार हे केरळमधील थ्रिसूर वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत. त्यांचा हा डान्स व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून ते दोघे सोशल मीडियावर प्रसिद्ध होत आहेत. नवीन आणि जानकीने याआधी देखील अनेक डान्स व्हिडिओ शेअर केले आहेत. इंस्टाग्रामवर जानकीच्या फॉलोवर्सची संख्या 15 हजारांपेक्षा अधिक, तर नवीनच्या फॉलोवर्सची संख्या 23 हजारांपेक्षा अधिक आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-एकदम कडक! ‘टॉप टकर’ गाण्यावर थिरकली ‘नॅशनल क्रश’, वाढदिवसानिमित्त व्हिडिओची सोशल मीडियावर धमाल