[rank_math_breadcrumb]

केसरी २ बघताना तुम्ही फोनला हात सुद्धा लावू नका; अक्षय कुमारची चाहत्यांना विनंती…

अक्षय कुमार अभिनीत ‘केसरी २‘ चित्रपटाची कथा जालियनवाला बाग हत्याकांडाच्या दुःखद घटनेवर आधारित आहे. १८ एप्रिल रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाबद्दल चाहते खूप उत्सुक असल्याचे दिसून येत आहे. अभिनेता त्याचे जोरदार प्रमोशन करत आहे. त्याच्या स्क्रीनिंग दरम्यान, अक्षय कुमारने फोन ठेवण्याचे कारण सांगितले.

‘केसरी २’ हा चित्रपट गेल्या मंगळवारी प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या संपूर्ण स्टारकास्टसह अनेक सेलिब्रिटींनी त्याच्या प्रीमियर कार्यक्रमाला हजेरी लावली. त्याच कार्यक्रमात अक्षय कुमारने माध्यमांशी बोलताना सांगितले की, प्रेक्षकांनी हा चित्रपट नक्कीच पाहावा आणि आपल्या देशाचा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. चित्रपट पाहताना तुम्ही तुमचा फोन खिशात ठेवा आणि प्रत्येक संवाद ऐका अशी विनंतीही त्यांनी केली. चित्रपटादरम्यान जर कोणी सोशल मीडिया तपासला तर तो चित्रपटाचा अपमान ठरेल, असेही त्यांनी म्हटले. म्हणून फोन दूर ठेवा.

करण सिंह त्यागी दिग्दर्शित या चित्रपटात अक्षय कुमार व्यतिरिक्त इतर अनेक दिग्गज कलाकारही आहेत. या चित्रपटात आर. माधवन हे वकील नेव्हिल मॅककिन्ले यांची मुख्य भूमिका साकारत आहेत आणि अनन्या पांडे तरुण वकील दिलरीत गिल यांची भूमिका साकारत आहेत. हा चित्रपट धर्मा प्रॉडक्शनने तयार केला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा  

गायक महेंद्र कपूर यांच्यावर पुरस्कार सोहळा; सिनेसृष्टीतल्या अनेक दिग्गजांनी लावली हजेरी…