Tuesday, July 9, 2024

Brahmastra | ‘केसरिया’च्या ‘या’ ओळीची उडवली जातेय खिल्ली, मीम्सचा आलेला पूर पाहून तर व्हाल लोटपोट!

अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटातील पहिले गाणे ‘केसरिया’ रविवारी (१७ जुलै) रिलीझ झाले. या गाण्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते. मात्र रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्टचे (Alia Bhatt) हे गाणे ऐकल्यानंतर काही चाहत्यांची निराशा झाली आहे. ज्यामुळे ते आता ‘केसरिया’ गाण्याला सोशल मीडियावर खूप ट्रोल करत आहेत. तसेच खूप मजेदार मीम्स शेअर करत आहे.

ट्रोल केली जातेय ‘केसरिया’ गाण्याची ‘ही’ ओळ
खरंतर, काही काळापूर्वी ‘ब्रह्मास्त्र’च्या या ‘केसरिया’ गाण्याचा टीझर रिलीझ झाला होता, त्यानंतर ‘केसरिया तेरा इश्क है पिया’ ही ओळ प्रेक्षकांच्या जिभेवर अडकली होती. पण १७ जुलै रोजी जेव्हा या गाण्याचे पूर्ण व्हर्जन रिलीझ झाले, तेव्हा चाहते त्यातील ‘लव्ह स्टोरीज’च्या बोलांची खिल्ली उडवत आहेत. एका ट्विटर युजरने ट्वीट करून लिहिले आहे की, “केसरिया गाण्यातील फक्त ‘लव्ह स्टोरिया’ ही ओळ बिर्याणीत वेलची बरोबर आहे.” तर मीम्स शेअर करताना आणखी एका यूजरने केसरिया गाण्यातील सर्वात वाईट ‘लव्ह स्टोरीज’ लाइन असल्याचे सांगितले आहे. अशाच काही मीम्सच्या माध्यमातून ‘ब्रह्मास्त्र’चे हे गाणे ट्रोल केली जात आहे. (kesariya song brutally troll on social media)

रिलीझ होताच हिट झाले ‘केसरिया गाणे’
एकीकडे ‘ब्रह्मास्त्र’चे ‘केसरिया’ गाणे सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. पण दुसरीकडे रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या या गाण्याला खूप पसंती दिली जात आहे. ८ तासात यूट्यूबवर या गाण्याला ८५ लाखांहून अधिक व्ह्यूज आले आहेत. यासोबतच या गाण्याला ९.७ लाख लोकांनी लाईक्स दिले आहेत. ‘ब्रह्मास्त्र’चे हे लेटेस्ट गाणे सुपरहिट ठरेल यात शंका नाही.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा