राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याच्या प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयाने सुनावणी करताना मराठी अभिनेत्री केतकी चितळे आणि विद्यार्थी निखिल भामरे यांच्याविरुद्ध नोंदवलेल्या सर्व एफआयआर एकत्र करण्याचे निर्देश दिले आहेत. हायकोर्टाच्या या निर्देशानंतर आता सर्व एफआयआर पहिल्या नोंदवलेल्या गुन्ह्याशी जोडले जाणार आहेत. केतकी विरोधात 22 आणि भामरे विरोधात 6 एफआयआर नोंदवण्यात आले आहेत.
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ठाणे जिल्ह्यातील कळवा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या पहिल्या एफआयआरसोबत आता चितळेविरोधातील सर्व एफआयआर जोडण्यात आले आहेत. त्याचवेळी भामरे यांच्याविरोधातील सर्व एफआयआर ठाण्यातील नौपाडा येथे दाखल झालेल्या गुन्ह्य़ात जोडण्यात आले आहेत.
सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती एनएम जामदार आणि न्यायमूर्ती एनआर बोरकर यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा हवाला देत हा आदेश दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, जेव्हा एखाद्या प्रकरणात अनेक एफआयआर नोंदवले जातात, तेव्हा पहिली एफआयआर मुख्य मानली जाऊ शकते. तसेच उर्वरितांना संबंधित प्रकरणात साक्षीदार म्हणून ग्राह्य धरता येईल. केतकी आणि भामरे यांना या वर्षी मे महिन्यात अटक करण्यात आली होती.
मात्र, त्यांना जूनमध्ये जामीन मंजूर करण्यात आला होता.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा अपमानास्पद उल्लेख करणारी मराठी कविता फेसबुकवर शेअर केल्याप्रकरणी केतकीला अटक करण्यात आली होती. त्याचवेळी पवारांविरोधात आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी भामरेला अटक करण्यात आली होती.
हेही वाचा –
सुकेश चंद्रशेखर नंतर ‘या’ इटालियन अभिनेत्याच्या प्रेमात पडली जॅकलीन, व्हायरल व्हिडिओने रंगली चर्चा
कपिल शर्माचा नवा लूक, हेअरस्टाइल आणि फिटनेस पाहून व्हाल थक्क
‘राजपुत आहे झुकणार नाही’, म्हणताच भडकले विवेक अग्निहोत्री; म्हणाले, ‘आम्ही सगळे काय मोदींचे…’