Sunday, June 8, 2025
Home मराठी केतकी माटेगावकरच्या नवीन गाण्याचा टिझर रिलीझ, ‘या’ तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला

केतकी माटेगावकरच्या नवीन गाण्याचा टिझर रिलीझ, ‘या’ तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला

‘सारेगामापा लिटिल चॅम्प्स’ या शोमधून एक गोड आवाजाची गायिका प्रसिद्ध झाली. केवळ गाण्यापुरते मर्यादित न राहता तिने अभिनयात देखील तिचे कौशल्य दाखवले आहे. हो अगदी बरोबर ओळखलंत! ही गायिका आणि अभिनेत्री म्हणजे आपल्या सर्वांची लाडकी केतकी माटेगावकर. केतकीच्या अभिनयाचा प्रवास ‘शाळा’ या चित्रपटापासून सुरू झाला. त्यानंतर ती अभिनयात आणि गायनात प्रगतीच करत राहिली. अनेक मालिकांसाठी तिने शीर्षक गीते गायली आहेत. तसेच अनेक चित्रपटात देखील गाणी गायली आहेत. अशातच तिचे आणखी एक नवेकोरे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याची माहिती तिने सोशल मीडियावरून दिली आहे.

केतकीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिच्या आगामी गाण्याचा टिझर शेअर केला आहे. यामध्ये केतकी दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करून तिने लिहिले आहे की, “चांदणे तुझवरी, ४ सप्टेंबर.” यावरून तिच्या आगामी गाण्याचे नाव ‘चांदणे तुझवरी’ आहे हे लक्षात येत आहे. तिचे हे गाणे ४ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. (Ketaki mategaonkar’s upcoming song’s teaser release)

‘चांदणे तुझवरी’ हे गाणे स्वतः केतकीने गायले आहे. कल्याणी पाई यांनी या गाण्याचे लेखन केले आहे. तसेच धवल चांडवडकर यांनी या गाण्याला संगीत दिले आहे. याआधी देखील तिने गाणी गायली आहेत. तिच्या प्रत्येक गाण्याला तिच्या चाहत्यांनी जोरदार प्रतिसाद दिला आहे. आता तिचे हे गाणे ऐकण्यासाठी सगळे उत्सुक आहेत.

तिने ‘बालगणेश’, ‘तानी’, ‘टाईमपास २’, ‘वाय झेड’, ‘फोटोकोपी’, ‘प्रेम हे’, ‘आनंदी गोपाळ’ या चित्रपटातील गाण्यांना तिचा आवाज दिला आहे. तसेच तिने ‘वैदेही’ या मालिकेचे शीर्षक गीत गायले आहे.

केतकीला २०१२ साली ‘काकस्पर्श’ या चित्रपटातील भूमिकेसाठी इंटरनॅशनल फिल्म एँड थिएटरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला होता. याव्यतिरिक्त ‘टाईमपास’ मधील प्राजूच्या भूमिकेमुळे देखील ती घराघरात पोहोचली. यासोबत ती ‘तानी’, ‘फुंतरू’, ‘आरोही गोष्ट तिघांची’, ‘टाईमपास २’ या चित्रपटात झळकली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अबब! मौनी रॉयने बिकिनीमध्ये केला इंटरनेटवर कहर, बोल्ड अंदाज पाहून चाहतेही झाले हैराण

-Bigg Boss OTT: शोवर भडकली माजी स्पर्धक सोफिया हयात; म्हणाली ‘करण जोहर सलमान खानपेक्षाही वाईट…’

-जेव्हा शाहरुख खानला महिला चाहती म्हणाली होती, ‘आय लव्ह यू अक्षय’; रंजक आहे ‘तो’ किस्सा

हे देखील वाचा