Friday, February 27, 2026
Home हॉलीवूड दु:खद! हॉलिवूड अभिनेत्याचे ३२ व्या वर्षी रस्ते अपघातात निधन; गाडीखाली अर्धवट अवस्थेत मिळाला मृतदेह

दु:खद! हॉलिवूड अभिनेत्याचे ३२ व्या वर्षी रस्ते अपघातात निधन; गाडीखाली अर्धवट अवस्थेत मिळाला मृतदेह

हॉलिवूड सिनेसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे. बुधवारी (२६ मे) प्रसिद्ध अभिनेता केव्हिन क्लार्क याचे रस्ते अपघातात निधन झाले आहे. केव्हिनने वयाच्या ३२ व्या वर्षी या जगाला निरोप दिला आहे. या अचानक समोर आलेल्या धक्कादायक बातमीने चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला आहे. सोशल मीडियावर चाहत्यांसोबतच इतर कलाकारही दुःख व्यक्त करत आहेत.

पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, ३२ वर्षीय केव्हिन क्लार्क सायकवलवरून चालला होता आणि त्याच वेळी एका कारने त्याला जोरदार धडक दिली आणि त्याचा अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या म्हणण्यानुसार, ज्या कारने केव्हिनचा अपघात झाला, ती कार एक २० वर्षांची महिला चालवत होती. जेव्हा घटनास्थळी पोलिस पोहोचले, तेव्हा केव्हिन हा गाडीच्या खाली अर्धवट अवस्थेत आढळला. केव्हिनला चिंताजनक स्थितीमध्ये अ‍ॅडव्होकेट इलिनॉय मेसोनिक मेडिकल सेंटरमध्ये नेण्यात आले. तेथे थोड्याच वेळात त्याला मृत घोषित करण्यात आले.

‘स्कूल ऑफ रॉक’ या चित्रपटात ड्रमर फ्रेडी, ‘स्पॅजी मेगी’ चित्रपटात जोन्सची भूमिका साकारणाऱ्या, अभिनेता केव्हिन क्लार्कच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. अभिनेता जॅक ब्लॅकने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून ही माहिती दिली आणि शोक व्यक्त केला आहे. जॅक ब्लॅकने इंस्टाग्रामवर लिहिले की, “धक्कादायक बातमी…केव्हिन निघून गेला आहे, यावर विश्वासच बसत नाहीये.”

केव्हिन आणि जॅक २००३ साली, ‘स्कूल ऑफ रॉक’ या चित्रपटात एकत्र दिसले होते. विशेष म्हणजे, या चित्रपटात अभिनय करून झाल्यानंतरही केव्हिनने ड्रम वाजवणे सुरूच ठेवले होते. मिळालेल्या माहितीनुसार, केव्हिनने अलीकडेच ‘जेस बेस अँड द इन्टॅन्टेन्स’ या बँडसोबत काम केले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा