Monday, July 1, 2024

अखेर ‘केजीएफ चॅप्टर २’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर, ‘या’ दिवशी सिनेमा बॉक्स ऑफिसवर करणार धमाका

कोरोना काळात लॉकडाऊनमुळे प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांचे वेळापत्रक पूर्णपणे गडबडले. शुटिंगपूर्ण झालेले अनेक सिनेमे प्रदर्शनाविना रखडले आहेत. यात काही मोठ्या आणि बहुप्रतीक्षित चित्रपटांचा देखील समावेश आहे. असाच एक सिनेमा म्हणजे ‘केजीएफ चॅप्टर २.’ केजीएफ सिनेमाचा पुढचा भाग असणाऱ्या या चित्रपटाची मागील अनेक काही महिन्यांपासून वाट पाहिली जात आहे. या सिनेमातील मुख्य नायक असणाऱ्या ‘यश’साठी तरुणीच काय तरुण देखील वेडे झाले होते. या एका सिनेमाने यशला ना भूतो ना भविष्यती अशी लोकप्रियता आणि प्रसिद्धी संपूर्ण जगात मिळवून दिली.

आता प्रेक्षकांच्या या सिनेमाच्या प्रदर्शनाबाबत असलेल्या उत्सुकतेवर आणि सिनेमा कधी प्रदर्शित होणार या प्रश्नावर अखेर उत्तर मिळाले आहे. आज रक्षाबंधनाचा मुहूर्त साधत चित्रपटाच्या टीमने ‘केजीएफ २’ च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. १४ एप्रिल २०२२ रोजी ‘केजीएफ चॅप्टर २’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २०१८ साली ‘केजीएफ’चा पहिला भाग प्रदर्शित झाला होता. तेव्हापासूनच सिनेमाच्या पुढच्या भागाची प्रतीक्षा लोकांना होती. (kgf 2 to release in theatres on april 2022)

होंबळे फिल्म्सने ‘केजीएफ २’च्या नवीन पोस्टरसह तारखेची घोषणा करताना ट्विटरवर लिहिले, “आजची अनिश्चितता आमच्या संकल्पात उशीर करत आहे. मात्र आमच्या दिलेल्या वचनानुसार आम्ही १४ एप्रिल २०२२ रोजी आमचा सिनेमा प्रदर्शित करत आहोत. #KGF2onApr14 ”

‘केजीएफ चॅप्टर २’ या चित्रपटाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे सिनेमात असलेल्या तगड्या कलाकारांची फौज. शिवाय हा सिनेमा आधीच्या चित्रपटापेक्षा अधिक भव्य असणार आहे. ‘केजीएफ चॅप्टर २’ या ऍक्शनपटात मुख्य भूमिकेत यश दिसणार असून, संजय दत्त हा मुख्य खलनायक ‘अधिरा’ची भूमिका साकारणार आहे. तर रविना टंडन भारताच्या पंतप्रधान रमिका सेनची भूमिका साकारणार आहे. सोबतच प्रकाश राज, अनंत नाग, श्रीनिधी शेट्टी आदी अनेक कलाकार महत्वाच्या भूमिका साकारताना दिसणार आहे. मागच्याच वर्षी रविना टंडन आणि संजय दत्त यांचा लूक प्रदर्शित करण्यात आला होता.

तत्पूर्वी ‘केजीएफ’ सिनेमाच्या पहिल्या भागाने बॉक्स ऑफिसवर ताबडतोड कमाई करत २५० कोटींचा गल्ला जमवला. यशाने साकारलेली ‘रॉकी’ भूमिका तुफान गाजली होती. ‘केजीएफ २’ हा सिनेमा कन्नड, तामिळ, तेलगू, मल्याळम आणि हिंदी या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

 

 

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘ब्यूटी क्वीन’ डिंपल हयातीला रवी तेजाने दिले वाढदिवसाचे खास गिफ्ट; शेअर केला आगामी ‘खिलाडी’चा रोमॅंटिक पोस्टर

-खण स्कर्ट घालून रुपाली भोसलेने शेअर केले ‘हटके’ फोटोशूट, मात्र सर्वत्र रंगलीय ड्रेसची चर्चा

-‘ही’ व्यक्ती आहे अंकिता लोखंडेसाठी खूप खास; फोटो शेअर करत म्हणाली, ‘तू माझ्यासाठी…’

हे देखील वाचा