कन्नड सुपरस्टार यशची( Yash) प्रमुख भूमिका असलेल्या ‘केजीएफ चॅप्टर २’ चित्रपटाची प्रेक्षकांना अनेक दिवसांपासून उत्सुकता लागली होती. केजीएफ १ च्या दणदणीत कथेमुळे हा चित्रपट प्रचंड लोकप्रिय झाला होता. चित्रपटाची कथा आणि दमदार अभिनय यांमुळे या चित्रपटाने सर्वांचीच मने जिंकली होती. आता नुकत्याच प्रदर्शित झालेल्या केजीएफ २ नेही देशभरातील सिनेमागृहांमध्ये जोरदार रेकॉर्ड ब्रेक कमाई करत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. त्यामुळेच या चित्रपटाने कमाईचे नवनवीन रेकॉर्ड प्रस्थापित केले आहेत.
याबाबत संपूर्ण माहिती अशी की, अभिनेता यश स्टारर ‘केजीएफ चॅप्टर २’ ला भारतात जबरदस्त ओपनिंग मिळाली आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी हिंदी भाषिक प्रदेशात ५३.९५ कोटींचा व्यवसाय केला, जो आत्तापर्यंतच्या कोणत्याही भारतीय चित्रपटासाठी सर्वाधिक ओपनिंग-डे कलेक्शन आहे. सुमारे १०० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाचे पहिल्या दिवशीचे कलेक्शन पॅन इंडियामध्ये १३४.५ कोटी इतके आहे. यासह चित्रपटाने पहिल्याच दिवशी आपल्या बजेटच्या १००% पेक्षा जास्त कमाई केली आहे. यश शिवाय या चित्रपटात संजय दत्त आणि रवीना टंडन यांच्याही भूमिका आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन प्रशांत नील यांनी केले आहे.
चित्रपट समीक्षक मनोबाला विजयबालन यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याबद्दलची माहिती सांगितली आहे. यामध्ये त्यांनी सांगितले की “‘केजीएफ चॅप्टर २’ ने पहिल्याच दिवशी 53.95 कोटी रुपये कमावले आहेत. या चित्रपटाचे वर्णन करताना मनोबाला म्हणाला की “‘केजीएफ चॅप्टर २’ हा भारतातील पहिला चित्रपट आहे ज्याने बॉलिवूड चित्रपटालाही मागे टाकले आहे. याआधी हृतिक रोशनच्या वॉरने ५१ कोटी आणि राजामौलीच्या आरआरआऱ चित्रपटाने २० कोटींची कमाई केली होती. केजीएफ चॅप्टर २ जगभरातील १०,०००हून अधिक स्क्रीनवर रिलीज झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनला एकूण ४४०० स्क्रीन्स मिळाल्या आहेत. त्याचबरोबर यशचा चित्रपट दक्षिणेत २६००, परदेशात ११०० आणि इतर भाषांमध्ये २९०० स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे.”
दरम्यान ‘केजीएफ चॅप्टर २’ चित्रपटाची सुरुवात दिवंगत अभिनेते पुनीत राजकुमार यांच्या फोटोंनी झाली. यामध्ये पुनीत राजकुमारच्या लहानपणापासून त्याचा शेवटचा फोटो दाखवण्यात आला आहे. यासोबत निर्मात्यांनी लिहिले आहे की, जोपर्यंत आम्ही तुम्हाला पुन्हा भेटू तोपर्यंत आम्ही तुम्हाला लक्षात ठेवू. त्याच्या एका चाहत्याने त्याचा फोटोही सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा चित्रपट आता जोरदार कमाई करताना दिसत आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा