Monday, April 21, 2025
Home अन्य ज्या नावाने धोका दिला आता त्याच नावाने जगभर ओळख निर्माण केलीये; सलाम रॉकी भाई!

ज्या नावाने धोका दिला आता त्याच नावाने जगभर ओळख निर्माण केलीये; सलाम रॉकी भाई!

सध्या चित्रपटगृहात सुपरस्टार यशचा ‘केजीएफ चॅप्टर २’ चांगलाच धुमाकूळ घालताना दिसत आहे. अनेक दिवसांपासून प्रेक्षकांना या चित्रपटाची उत्सुकता लागली होती. आता प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशीपासूनच चित्रपटाने कमाईचे नवनवीन रेकॉर्ड करायला सुरूवात केली आहे. चित्रपटात यशच्या दमदार अभिनयाचे सगळेच कौतुक करताना दिसत आहेत. प्रेक्षकांना त्याच्या रॉकी भाईची भूमिका प्रचंड आवडली आहे. या भूमिकेमुळे त्याला त्याचे चाहते रॉकी भाई म्हणूनच ओळखायला लागले आहेत. मात्र या आधी यशला (Yash)  याच रॉकी भाई नावानेच आलेल्या चित्रपटातील भूमिकेला सुपरफ्लॉपचा ठपका लागला होता. काय आहे हे प्रकरण चला जाणून घेऊ. 

सध्या देशभरात केजीएफमधील रॉकी भाईचीच चर्चा पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने सुपरस्टार यशला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र रॉकी भाईचाच बोलबाला पाहायला मिळत आहे. मात्र रॉकीच्या नावानेच सुपरस्टार यशचा एक चित्रपट याआधीही प्रदर्शित झाला होता. जो सुपरफ्लॉप ठरला होता. केजीएफ स्टार यशचा ‘रॉकी’ हा चित्रपट २००८ मध्ये प्रदर्शित झाला होता.

हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा रॉकी बनलेला यश लोकांवर ती छाप सोडू शकला नाही आणि लोकांना तो चित्रपटही आवडला नाही त्यामुळे चित्रपट काही खास कमाल  दाखवू शकला नाही आणि फ्लॉप झाला. हा एक दक्षिण भारतीय चित्रपट होता जो कन्नडमध्ये बनला होता. चित्रपट ५ कोटींमध्ये बनला होता ज्यामध्ये बियांका देसाई, जय जगदीश, रमेश भट्ट आणि संतोष मुख्य भूमिकेत होते.२००८ मध्ये यशचा हा चित्रपट जरी फ्लॉप ठरला असला तरी १० वर्षांनंतर त्याने पडद्यावर धमाका केला आणि रॉकी नाव प्रत्येकाच्या आठवणीत राहिले.

त्यानंतर ‘केजीएफ चॅप्टर १’ हा चित्रपट २०१८ साली प्रदर्शित झाला होता आणि तो जबरदस्त हिट ठरला. या चित्रपटाने यशला रातोरात मोठा स्टार बनवले. विशेष म्हणजे या चित्रपटातही त्याच्या भूमिकेचे नाव रॉकी होते पण यावेळी रॉकी फ्लॉप झाला नाही, तर सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा सुपरस्टार ठरला. ‘केजीएफ चॅप्टर १’ पासून ‘केजीएफ चॅप्टर २’ ची आतुरतेने वाट पाहत होती. आता ती प्रतीक्षा संपली आहे. चित्रपट सध्या सिनेमागृहात जोरदार सुपरहीट ठरत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

   हेही वाचा-

हे देखील वाचा