कलाकारांबद्दल फॅन्समध्ये असलेली क्रेझ अनेकदा आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींमधून पाहायला मिळते. आपल्या आवडत्या कलाकारावर असलेले आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी फॅन्स अनेक क्लुप्त्या लढवत असतात. कलाकारांना भेटवस्तू देणे, सोशल मीडियाद्वारे प्रेम व्यक्त करणे अशा अनेक मार्गानी फॅन्स मीच सर्वात मोठा फॅन असल्याचे दर्शविण्याचा प्रयत्न करतात.
हेच फॅन्सचे प्रेम कधी कधी कलाकारांसाठी डोकेदुखी सुद्धा ठरते. जसे कलाकरांना रात्री बेरात्री कॉल करणे, मेसेज करणे, त्यांचा पाठलाग करणे अशा अनेक गोष्टी कलाकारांना त्रासदायक ठरतात. मात्र नुकतीच अशी घटना घडली आहे ज्यामुळे फॅन्सच्या इतर सर्व गोष्टी अगदी मामूलीच वाटतील.
केजीएफ स्टार यश सर्वानाच माहित आहे. केजीएफ चित्रपटाने यशला संपूर्ण जगात ओळख मिळवून दिली. याच यशच्या फॅनने सर्वांना विचार करायला लावणारी गोष्ट केली आहे. कर्नाटकमधील मांड्या जिल्ह्यात राहणाऱ्या २५ वर्षीय रामकृष्णने फाशी घेत आत्महत्या केली आहे. त्याने आत्महत्येपूर्वी कन्नड भाषेत एक सुसाईड नोट देखील लिहिली आहे.
त्याने या नोटमध्ये लिहिले की, त्याच्या दोन इच्छा होत्या. तो अभिनेता यश आणि विरोधीपक्ष नेते सिद्धारमैया यांचा मोठा फॅन होता. या दोघांनी त्याच्या अंतिम संस्कारासाठी यावे. हीच त्याची शेवटची इच्छा होती. सोबतच रामकृष्णने हे देखील लिहिले की, तो जीवनात खूप अयशस्वी झाला होता. कारण तो त्याच्या आईचा चांगला मुलगा, मोठ्या भावाचा चांगला भाऊ बनू शकला नाही. त्याने त्यांच्या प्रेमाचे मन देखील जिंकू शकला नाही. म्हणूनच त्याने आत्महत्या केल्याचे लिहिले आहे.
रामकृष्णच्या अंतिम संस्कारासाठी विरोधी पक्ष नेते सिद्धारमैया पोहोचले होते. सिद्धारमैया यांनी ट्विट करत लिहिले, ” मला आठवत नाही की मी कधी त्याला भेटलो आहे. पण आपल्या एखाद्या प्रशंसकाला अशा परिस्थितीत भेटणे खूप दुर्दैवी आहे. कोणीही एवढ्या छोट्या वयात असे पाऊल उचलणे खूप वाईट आहे.”
ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ಸಾವು ಎಂದಿಗೂ ಪರಿಹಾರವಲ್ಲ. ಸಮಸ್ಯೆಗೆ ಹೆದರಿ ಆತ್ಮಹತ್ಯೆ ಮಾಡಿಕೊಳ್ಳುವುದು ಎಂದರೆ ತಮ್ಮ ಸಮಸ್ಯೆಯನ್ನು ಬೇರೊಬ್ಬರ ಹೆಗಲಿಗೆ ವರ್ಗಾಯಿಸಿದಂತೆ. ಸಾವಿನ ನಂತರವೂ ಸಮಸ್ಯೆ ಹಾಗೆಯೇ ಉಳಿಯುತ್ತೆ, ಆದರೆ ಅಮೂಲ್ಯ ಬದುಕೊಂದು ನಷ್ಟವಾಗುತ್ತೆ. 2/5 pic.twitter.com/zfKgfP4cHl
— Siddaramaiah (@siddaramaiah) February 18, 2021
अभिनेता यशने देखील या घटनेवर ट्विट करत त्याचे मत मांडले आहे. त्याने लिहिले, ” आम्ही कलाकार तुमच्या टाळ्या, शिट्या ऐकत असतो. तुम्ही आमच्यावर जो प्रेमाचा वर्षाव करतात, त्याचसाठी आम्ही जगत असतो. मला तुमच्याकडून (फॅन्सकडून) अशी अपेक्षा बिलकुल नाहीये. त्याच्या आत्म्याला शांती मिळो.”
ಅಭಿಮಾನಿಗಳ ಅಭಿಮಾನವೇ ನಮ್ಮ ಬದುಕು.. ಜೀವನ.. ಹೆಮ್ಮೆ..
ಆದರೆ ಮಂಡ್ಯದ ರಾಮಕೃಷ್ಣನ ಅಭಿಮಾನಕ್ಕೆ ಹೆಮ್ಮೆಪಡಲು ಸಾಧ್ಯವೇ…
ಅಭಿಮಾನಿಗಳ ಅಭಿಮಾನಕ್ಕೆ ಇದು ಮಾದರಿಯಾಗದಿರಲಿ.. ಕೋಡಿ ದೊಡ್ಡಿ ರಾಮಕೃಷ್ಣನ ಆತ್ಮಕ್ಕೆ ಚಿರಶಾಂತಿ ಸಿಗಲಿ…
ಓಂ ಶಾಂತಿ…— Yash (@TheNameIsYash) February 18, 2021
लवकरच यश त्याच्या आगामी केजीएफ २ सिनेमात दिसणार आहे.










