Wednesday, October 15, 2025
Home अन्य एक नारी सब पे भारी! सर्वांना धूळ चाखवत दिव्यांकाने मारली बाजी, ठरली ‘टिकेट टू फिनाले’ची विजेती

एक नारी सब पे भारी! सर्वांना धूळ चाखवत दिव्यांकाने मारली बाजी, ठरली ‘टिकेट टू फिनाले’ची विजेती

‘खतरों के खिलाडी’मध्ये रोज जीवघेणे स्टंट केले जातात. यामध्ये प्रत्येकाला जिंकण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता खेळावे लागते. प्रत्येक खेळामध्ये आणि स्पर्धेमध्ये जसजसे आपण पुढे जातो तसतसे कठीण टास्क वाढत जातात. सध्या ‘खतरों के खिलाडी’ चे ११ वे पर्व संपण्याच्या वाटेवर आहे. अशात येथील स्पर्धकांना एका पेक्षा एक कठीण टास्कचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे महाअंतिम फेरीमध्ये पोहचण्यासाठी सर्व स्पर्धकांना दोन टास्क खेळावे लागले यामध्ये या स्पर्धकांना नेहमी पेक्षा जास्त कठीण टास्क पार करायचा होता.

अंतिम फेरीमध्ये प्रवेश घेण्यासाठी त्यांना ‘टिकेट टू फिनाले’ हा टास्क पूर्ण करायचा होता. यामध्ये देखील स्पर्धकांच्या जोड्या तयार करण्यात आल्या होत्या.
अर्जुन बिजलानी – विशाल आदित्य सिंग, वरुण सूद- राहुल वैद्य , दिव्यांका त्रिपाठी- अभिनव शुक्ला अशा स्पर्धकांच्या जोड्या करण्यात आल्या होत्या. हा टास्क सर्व स्पर्धकांना कमीत कमी वेळेमध्ये आणि पाण्यामध्ये पूर्ण करायचा होता. यामध्ये अर्जुन बिजलानी – विशाल आदित्य सिंगने जास्त वेळ घेतला, तर दिव्यांका त्रिपाठी- अभिनव शुक्लाने हा टास्क कमीत कमी वेळेत पूर्ण केला. (khatron ke khiladi 11 divyanka tripathi won ticket to finale to beating rahul vaidya and other contestants know details)

त्यानंतर दुसरा टास्क घेण्यात आला. यामध्ये देखील स्पर्धकांच्या दोन जोड्या बनवण्यात आल्या होत्या. राहुल वैद्य- दिव्यांका त्रिपाठी, अभिनव शुक्ला- वरुण सूद अशा जोड्या दुसऱ्या टास्क साठी करण्यात आल्या होत्या. हा एक कार स्टंट होता. सर्व स्पर्धकांना १० झेंडे घेऊन यायचे होते. यामध्ये राहुल-दिव्यांकाने १३ झेंडे काढले, तर अभिनव-वरुणने १० झेंडे काढले. राहुल आणि दिव्यांकाने यामध्ये विजय मिळालवला आणि शेवटचा टास्क या दोघांमध्ये झाला.

भिडले एकमेकांना राहुल-दिव्यांका 

‘टिकेट टू फिनाले’मध्ये जाण्यासाठी या दोघांनी चांगलीच कंबर कसली. दोघेही सर्व ताकत पणाला लावून हा टास्क पूर्ण करत होते. परंतु दिव्यांकाने मोठ्या शर्थीने राहुलला हरवले आणि ती अंतिम फेरीमध्ये पोहचली. दिव्यांका आधीपासूनच सर्व टास्क मोठ्या जिद्दीने पार पाडत आली आहे. तसेच आता देखील तिचाच विजय झाला.

रोहित शेट्टीने गायले कौतुकाचे गीत
दिव्यांका ‘खतरों के खिलाडी’मध्ये सुरुवातीपासून दमदार आणि निर्भीडपणे टास्क पूर्ण करत आली आहे. तिची जिद्द, मेहनत आणि चिकाटी पाहून रोहितने तिचे या आधी देखील अनेकवेळा कौतुक केले आहे. तिच्यामध्ये दांडगा आत्मविश्वास आहे. त्यामुळेच सध्या ती सर्व मुलांवर भारी पडत आहे. सर्व प्रेक्षकांना ती महाअंतिम फेरीमध्ये देखील विजयी होईल असे वाटत आहे.

सना मकबूल आणि श्वेता तिवारी हे दोघे आधीच या टास्कमधून बाद झाले होते. त्यामुळे फक्त ८ स्पर्धक येथे शिल्लक होते. या सर्वांनी ‘टिकेट टू फिनाले’साठी मोठी कसरत केली. ज्यामध्ये आता दिव्यांका पुढे पोहचली आहे, तर बाकीच्या स्पर्धकांना पुढे जाण्यासाठी आणखी मेहनत करावी लागणार आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अक्षय कुमारसोबत केले होते पदार्पण; मात्र सुंदरतेने वेड लावलेली शांतीप्रिया आज का राहतेय बॉलिवूडपासून दूर?

-सिद्धार्थ शुक्लाच्या कुटूंबाकडून जारी करण्यात आले निवेदन; मुंबई पोलिसांचे आभार मानत, लोकांना केली ‘ही’ विनंती

-हर्षवर्धन राणेनंतर ‘या’ प्रसिद्ध खेळाडूसोबत नात्यात आहे किम शर्मा; स्वत: केला खुलासा

हे देखील वाचा