बॉलिवूडमधील कलाकार असो किंवा छोट्या पडद्यावरील, तो जेव्हा आपल्या उत्तम कामगिरीने नावारुपाला येतो, तेव्हा त्याच्या कामासाठी त्याला अधिक पैसे मिळू लागतात. असेच काहीसे टीव्हीवरील प्रसिद्ध शो ‘बिग बॉस १४’ चा उपविजेता राहुल वैद्यच्या बाबतीत घडले आहे. त्याने आपल्या मानधनातत वाढ केली आहे. तो आता ‘खतरों के खिलाडी ११’ मध्ये स्टंट करताना दिसणार आहे. चाहते राहुलचा हा शो पाहण्यासाठी खूपच उत्साहित आहेत. यादरम्यान असे वृत्त येत आहे की, राहुल या सिझनचा सर्वात महागडा स्पर्धक असेल.
‘बिग बॉस’मध्ये भाग घेतल्यानंतर त्याची फॅन फॉलोविंग कमालीची वाढत आहे. त्यामुळे त्याला शोमध्ये घेण्यासाठी निर्मात्यांना चांगलीच रक्कम मोजावी लागणार आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, राहुलला एका एपिसोडसाठी १२ ते १५ लाख रुपये दिले जातील. त्यामुळे हे खूपच चांगले मानधन आहे.
असेही वृत्त आहे की, राहुलला दिशा परमारसोबत डान्स रियॅलिटी शो ‘नच बलिए’साठीही ऑफर मिळाली होती. मात्र, गायकाने ही ऑफर नाकारली. कारण दिशा आणि राहुल लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. तरीही, आतापर्यंत त्यांनी लग्नाची तारीख सांगितलेली नाही. त्यामुळे तोपर्यंत तो ‘खतरों के खिलाडी’मध्ये दिसणार आहे. राहुलव्यतिरिक्त या सिझनमध्ये वरुण सूद, सनाया इराणी, अर्जुन बिजलानी, दिव्यांका त्रिपाठी, अभिनव शुक्लासोबत बरेच कलाकार दिसणार आहेत.
‘खतरों के खिलाडी’ कधी होणार सुरू
नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार, यावेळी ‘खतरों के खिलाडी’ शोची शूटिंग केप टाऊनमध्ये होणार आहे. या शोमधील स्पर्धक पुढील महिन्यात ६ मेला सर्वजण विमानाने जाणार असून १ महिन्यासाठी तिथे राहतील. तसं पाहिलं, तर शूटिंग यापूर्वी एप्रिलमध्ये होणार होती, परंतु कोरोना व्हायरसमुळे शूटिंगला उशीर झाला. यानंतर निर्मात्यांनी केप टाऊनमध्ये शूटिंग करण्याचा निर्णय घेतला.
रोहित शेट्टी करणार होस्ट
‘खतरों के खिलाडी’चा हा सिझनही धडाकेबाज दिग्दर्शक रोहित शेट्टी होस्ट (सूत्रसंचालन) करणार आहे. मागील काही सिझनपासून रोहित हा शो होस्ट करत आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, जून किंवा जुलैच्या शेवटी शो सुरू होऊ शकतो.
मधान्या गाण्यातील राहुल- दिशाच्या केमिस्ट्रीने जिंकले चाहत्यांचे मन
काही दिवसांपूर्वी राहुल आणि दिशा परमार यांचे गाणे ‘मधान्या’ रिलीझ झाले होते. गाण्यात दोघांच्या लग्नाचा सीन दाखवण्यात आला होता. दोघांच्याही केमिस्ट्रीने चाहत्यांचे मन जिंकले. सोशल मीडियावरही या गाण्याची प्रशंसा करण्यात आली.
काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत आपल्या लग्नाबद्दल बोलताना राहुलने म्हटले होते की, “खरं सांगायचं झालं, तर आता लग्न करण्याची कोणतीही योजना नाही. मात्र, पुन्हा लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. जेव्हा आम्ही लग्नाबद्दल विचार करतो, तेव्हा काही ना काही होतंच. त्यामुळे आम्ही लग्नाची तारीख ठरवली नाही.”
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-