‘खतरों के खिलाडी’ या शोचे ११ वे पर्व सध्या अंतिम टप्प्यावर येऊन पोहचले आहे. जस जसा हा शो समाप्तीच्या मार्गावर चालला आहे तसतसे यातील स्टंट अधिकच कठीण होत चालले आहेत. या शोमध्ये आता फक्त पाच स्पर्धक राहिले आहेत. यामध्ये अर्जुन बिजलानी, वरुण सूद, श्वेता तिवारी, विशाल आदित्य सिंग आणि दिव्यांका त्रिपाठी यांचा समावेश आहे. नुकतंच जो टास्क खेळला गेला होता, त्यामध्ये रोहित शेट्टीने आधीच सर्व स्पर्धकांना टास्क खूप कठीण आहे हे सांगितले होते. यामध्ये स्पर्धकांना जमिनीपासून लांब उंचीवर असलेल्या एका खांबाला लावलेले झेंडे घ्यायचे होते. शेवटचा झेंडा घेतल्यावर तिथूनच खाली उडी मारायची होती. विशेष म्हणजे जमिनीपासून उंच आकाशात आलेल्या या खांबावर रांगत चढायचे होते.
हा टास्क पूर्ण करण्यासाठी सर्व स्पर्धकांच्या तीन तीनच्या जोड्या बनवण्यात आल्या. विशाल आदित्य सिंग सर्वात प्रथम हा टास्क पूर्ण करतो. त्यांनतर वरुण सूद आणि राहुल वैद्य हा टास्क पूर्ण करण्यासाठी येतात.
हा टास्क पूर्ण करताना विशाल आधीच सांगतो की “माझ्या पायाला दुखापत झाली आहे. परंतु हा टास्क पूर्ण करण्याचा मी १०० टक्के प्रयत्न करेन.” म्हटल्याप्रमाणे तो हा टास्क पूर्ण करतो. त्यानंतर वरुण देखील खूप छान पद्धतीने टास्क पूर्ण करतो. राहुल देखील यामध्ये भाग घेतो परंतु तो टास्क पूर्ण करत नाही. लक्ष विचलित व्हावं म्हणून तो एक गाणं देखील गातो परंतु नंतर तो हार मानतो. रोहित शेट्टी आणि त्याच्या चाहत्यांची माफी मागत तो म्हणतो की, “मला माझी कुवत माहित आहे. माझ्या पाठीमध्ये खूप दुःखत होतं. मला माहित होतं मी हा टास्क पूर्ण करू शकणार नाही, तरी पण मी प्रयत्न केला, पण मी यामध्ये अयशस्वी ठरल्यामुळे सर्वांची माफी मागतो.”
त्यानंतर अर्जुन, श्वेता आणि दिव्यांका हा टास्क खेळतात. यामध्ये अर्जुन आणि दिव्यांका हा टास्क पूर्ण करतात, तर श्वेता टास्क खेळण्या आधीच नकार देते.
त्यामुळे शेवटी श्वेता आणि राहुलला एक टास्क दिला जातो ज्यामध्ये जास्तीत जास्त वेळ बसून राहायचे असते. यामध्ये श्वेता बाजी मारते आणि राहुल हारतो. परिणामी त्याला शोमधून बाहेर काढले जाते.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-देव आनंद यांच्या रूपावर मरायच्या तरुणी, ‘यामुळे’ त्यांना सूट घालण्यावर शासनाने आणली होती बंदी
-अर्चना पूरन सिंग यांनी रात्री पळून जाऊन केलं होतं लग्न, बरंच चर्चेत राहिलंय त्यांचं वैयक्तिक आयुष्य