‘खतरों के खिलाडी’मध्ये आजवर आपण प्राण्यांपासून ते विजेच्या करंटपर्यंतचे सर्व स्टंट पाहिले आहेत. यामध्ये कधी उंदीर, साप, झुरळ आणि याहीपेक्षा भयानक प्राण्यांचा समावेश असतो. खतरों के खिलाडी म्हणजेच भीतीवर मात करणारे. या शोमध्ये भीती म्हणजे काय? हे विसरूनच खेळावे लागते. या शोमध्ये बऱ्याच वेळी साथीदारासोबत स्टंट पूर्ण करावा लागतो. साथीदाराच्या एका चुकीमुळे दुसऱ्यालाही हार पत्करावी लागते. नुकत्याच समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये, भीतीवर मात करणारे हे खिलाडी आता एका वेगळ्याच टेन्शनमध्ये आहेत. एका भीतीने अक्षरश: त्यांची रात्रीची झोप उडाली आहे. दिवसभर त्यांना ती गोष्ट खूप सतावत आहे.
सध्या ‘खतरों के खिलाडी’चे ११वे पर्व सुरुआहे. यामधील राहुल वैद्य, श्वेता तिवारी, दिव्यांका त्रिपाठी यांच्या सारखे मजबूत खेळाडू देखील पुरते घाबरले आहेत. या सर्वांना नेमकं झालं तरी काय? नेहमी मोठमोठे स्टंट करणारे हे खेळाडू, एवढे का घाबरलेले आहेत? त्यामुळे ‘खतरों के खिलाडी’मध्ये आता प्राणी आणि विजेचे शॉक याहीपेक्षा अजून भीतीदायक असं काय असू शकतं. हे जाणून घेऊयात. (khatron ke khiladi 11 shweta tripathi rahul vaidya divyanka tripathi arjun bijlani worried about)
यामुळे घाबरले आहेत सर्व स्पर्धक
या सर्व स्पर्धकांची झोप उडण्याचे कारण आहे ‘फियर फंदा’. जो स्पर्धक स्टंट नीट पूर्ण करू शकणार नाही, त्याच्या गळ्यात हा फियर फंदा पडणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच स्पर्धक हे पुरते भयभीत झाले असून, त्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. कलर्स टीव्हीच्या अधिकृत इंस्टाग्राम अकउंटवरून याची माहिती देण्यात आली आहे. या अकाउंटवरून एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आलं आहे. ज्यामध्ये सर्व स्पर्धक हे भयभीत झालेले दिसत आहेत. त्यांना सर्वत्र फियर फंदाच दिसत आहे. तसेच या व्हिडिओमध्ये राहुल वैद्य, श्वेता तिवारी, दिव्यांका त्रिपाठी आणि अर्जुन बिजलानी हे स्पर्धक फिअर फंद्यापासून आपल्याला वाचवत पळताना दिसत आहेत. आपल्याकडे फियर फंदा नको असेच सर्वांना वाटत आहे.
श्वेताने केली दिव्यांकाची पोलखोल
तर अलीकडच्या भागात श्वेता तिवारी दिव्यांका त्रिपाठीची पोल उघडताना दिसणार आहे. वास्तविक, दिव्यांका अनेकदा म्हणते की तिला उंचीची खूप भीती वाटते. पण श्वेताने सांगितले की, तिने ३ वेळा स्कायडायव्हिंग केले आहे आणि जेव्हा श्वेताने ही गोष्ट दिव्यांकाला विचारली, तेव्हा दिव्यांकाने अगदी भोळेपणाने उत्तर दिले की, “मी माझ्या प्रेमासाठी काहीही करू शकते” यावरून दिव्यांकाच्या धाडसाचा अंदाज येत आहे. याद्वारे ती जरा सुद्धा घाबरत नाही, हे देखील सिध्द होत आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-अनुपम अन् किरण यांच्या लग्नाला ३६ वर्षे पूर्ण; दोघांनीही दुसऱ्यांदा बांधली होती लगीनगाठ
-‘परी म्हणू की सुंदरा, श्रुतीची अदा करी नेहमीच फिदा,’ अभिनेत्रीच्या फोटोंचा सोशल मीडियावर राडा
-मोनालिसाने ‘साड़ी के फॉल सा’ गाण्यावर लावले जोरदार ठुमके; सोनाक्षीचाही डान्स वाटेल तिच्यासमोर फिका