Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘खतरों के खिलाडी’मध्ये भिडल्या प्रसिद्ध अभिनेत्री; एकीच्या चाहत्यांनी दुसरीला म्हटले, ‘घमंडी’

बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी होस्ट करत असलेल्या ‘खतरों के खिलाडी‘ या शोला चाहत्यांनी भरभरून प्रेम दिले आहे. या शोला मिळालेल्या प्रेमामुळेच या शोचे यंदाचे १२वे पर्व सुरू आहे. हे पर्व २ जुलैपासून सुरू झाले आहे. या पर्वात स्टंटच्या नावावर चांगलीच खडाजंगी रंगताना दिसत आहे. या पर्वाचे विजेतेपद पटकावण्यासाठी रुबीना दिलैक, श्रृती झा, मोहित मलिक, शिवांगी जोशी, जन्नत जुबेर, प्रतीक सहजपाल, निशांत भट्ट यांसारख्या इतर स्पर्धकांमध्ये जोरदार शर्यत लागली आहे. रविवारी (दि. १० जुलै) दाखवलेल्या एपिसोडमध्ये दोन अभिनेत्री एकमेकींना भिडताना दिसत आहेत.

झाले असे की, रविवारच्या एपिसोडमध्ये रुबीना दिलैक (Rubina Dilaik) हिला चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे स्टंटमध्ये टक्कर देणारी जन्नत जुबेर (Jannat Zubair) हिने हा टास्क आपल्या नावावर केला. त्यामुळे अधिकतर स्पर्धकांनी रुबीना आणि निशांत भट्ट (Nishant Bhatt) यांना एलिमिनेशन स्टंटमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला. मात्र, जेव्हा रुबीनाला स्टंटसाठी पाठवले जात होते, तेव्हा अभिनेत्रीने दावा केला की, जन्नतने स्टंट यासाठी जिंकला, कारण तिने तिला लॉक सीक्वेन्सबाबत सांगितले होते.

रुबीनाचे बोलणे ऐकून जन्नत खूपच अस्वस्थ झाली. त्याचवेळी जन्नतनेही रुबीनाला प्रतिक्रिया दिली. रुबीना जेव्हा तिच्या स्टंटसाठी तयार होत होती, तेव्हा जन्नत रुबीनाबद्दल म्हणाली, “तिच्याकडे एवढंच असतं, तर तिने ते केलं असतं. मी स्वतः स्टंट केले आणि जिंकले.” यावर तुषार कालिया पुढे आला आणि जन्नतला शांत होण्यास सांगितले आणि भांडण वाढवण्याची गरज नसल्याचे म्हणाला. मोहित मलिक आणि जन्नत जुबेर यांनी मात्र याबाबत चर्चा सुरूच ठेवली. एपिसोड टेलिकास्ट झाल्यानंतर प्रेक्षक जन्नतवर नाराज दिसले. आता रुबीनाचे चाहते जन्नतवर नाराज आहेत की, तिने तिच्या आवडत्या स्पर्धकासोबत गैरवर्तन केले.

यावरून जन्नतला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. एका युजरने लिहिले की, “आजच्या एपिसोडनंतर मी जन्नत जुबेरचा तिरस्कार करतो, तिला वाटते की, सोशल मीडियावर काही फॉलोअर्स असल्यामुळे ती मोठी स्टार आहे. काही लिपिसिंक व्हिडिओ बनवल्यानंतर ती इतकी गर्विष्ठ झाली आहे की, माझ्या रुबीनाच्या या सगळं मदतीच्या वृत्तीमुळे बोलत आहे. तू राणी आहेस रुबीना…”

रुबीनाच्या कामाबाबत बोलायचं झालं, तर ती शेवटची ‘अर्ध’ या सिनेमात झळकली होती. तिने ‘छोटी बहू’ या टीव्ही मालिकेतून अभिनयात पदार्पण केले होते. ही मालिका २००९ ते २०१२ दरम्यान सुरू होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

पैसे, संपत्ती नाव सगळं काही तरी देखील ‘या’ अभिनेत्री आयुष्यभर का राहिल्या अविवाहित

‘या’ मराठी अभिनेत्यांनाही करावा लागलाय घटस्पोटाचा सामना

‘भूतकाळापासून धडा घेऊन बरंच काही बदललं आहे’, ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ फेम मिहिर उपाध्यायचा खुलासा

हे देखील वाचा