Sunday, December 15, 2024
[aioseo_breadcrumbs]

खतरों के खिलाडी १२ : शिवांगी जोशीला सोडले मगरीच्या पिंजऱ्यात, भितीने अभिनेत्रीची झाली ‘अशी’ अवस्था

‘खतरों के खिलाडी’ हा कार्यक्रम चांगलाच लोकप्रिय आहे. आत्तापर्यंत झालेल्या या कार्यक्रमाच्या प्रत्येक सीझनला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद पाहायला मिळाला आहे. आता लवकरच  या टीव्ही शोचा १२वा सीझन लवकरच प्रसारित होणार आहे. यावेळी 15 स्पर्धकांनी या शोमध्ये भाग घेतला आहे. टीव्ही अभिनेत्री शिवांगी जोशीही या शोमध्ये आहे. एका नवीन प्रोमो व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या  व्हिडिओमध्ये शिवांगी  किंचाळताना दिसत आहे. त्याच वेळी, शोचा होस्ट रोहित शेट्टी मात्र तिला कसलीही दया दाखवताना दिसत नाही. 

शिवांगी जोशीचा हा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये रोहित शेट्टीने तिच्यासोबत प्रँक केलेला पाहायला मिळत आहे. शिवांगी जोशी यांच्याकडे भुकेल्या लोकांना जेवण देण्याचा टास्क दिला गेला आहे.  ती एका व्यक्तीला सत्य सांगते पण तिची फसवणूक होते. एक माणूस हात काढून घेतो. ती ओरडत राहते. रोहित शेट्टीलाही शिवांगीची अजिबात दया येत नाही. त्यानंतर शिवांगीला भुकेल्या मगरीच्या गोठ्यात आणून सोडले जाते. शिवांगीने मगरीकडे मांसाचा तुकडा टाकताच तिचे तीक्ष्ण दात पाहून ती घाबरते. वाईटरित्या घाबरल्यानंतर, शिवांगी स्वतःला तेथून बाहेर काढण्यासाठी विनवणी करू लागत असल्याचे दिसत आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

 

खतरों के खिलाडी शोमध्ये स्पर्धकांना असे धोकादायक स्टंट्स करावे लागतात. येथे त्यांना उंचावरून उडी मारण्यापासून ते प्राण्यांमध्ये पडून राहण्यापर्यंत त्यांचे टास्क पूर्ण करावे लागतात. यावेळी शोचे शूटिंग दक्षिण आफ्रिकेच्या घनदाट जंगलात केले जात आहे. या शोमध्ये रुबिना डिलेक, सृती झा, शिवांगी जोशी, कनिका मान, मोहित मलिक, निशांत भट्ट, राजीव अडातिया, तुषार कालिया, एरिका पॅकार्ड, चेतना पांडे, अनेरी वजानी यांच्यासह १५ स्पर्धक आहेत. यावेळी शोमधली सर्वाधिक चर्चेत असलेली जोडी आणि सोशल मीडिया स्टार श्री फैजू आणि जन्नत जुबेरची जोडी आहे. हा शो 2 जुलैपासून कलर्स वाहिनीवर रात्री 9 वाजता प्रसारित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

 

हे देखील वाचा